गोव्यातल्या युवकांचं सिंधुदुर्गातील रुग्णांना रक्तदान !

रुपेश कांबळी व संतोष शिंदे या रक्तदात्यांचं होतंय कौतुक

विनायक गांवस | प्रतिनिधी

सावंतवाडी : गोवा बांबुळी रुग्णालयात एका शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या सावंतवाडीतील एका रुग्णाला दोन ए पॉझिटिव्ह रक्ताची तात्काळ गरज असल्याचे सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेचे लक्ष वेधताच या रुग्णाला तात्काळ दोन रक्त दाते उपलब्ध करून युवा रक्ताचा संघटनेने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.

सावंतवाडीतील या मंगेश मेस्त्री यांच्यावर आज शुक्रवारी गोवा बांबुळी रुग्णालयात शस्त्रक्रिया करायची असून त्यांना तात्काळ दोन ए पॉझिटिव्ह रक्तदात्यांची गरज होती. याबाबत मेस्त्री कुटुंबियांनी युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी यांच्याशी संपर्क साधताच त्यानी माजगाव येथील बंटी कासार यांच्यामार्फत गोव्यातील दोन दाते तात्काळ उपलब्ध करून दिले.

रक्तदान केलेले गोव्यातील रुपेश कांबळी व संतोष शिंदे हे दोन्ही युवक गोवा वेर्णा येथील कोकाकोला कंपनीत कामाला आहेत. या दोघांनी स्वतःच्या वाहनाने बांबुळी रुग्णालय गाठून रक्तदान केले. या दोन्ही युवकांनी यापूर्वीही रक्तदान केलेले आहे. या दोघा रक्तदात्यांचे तसेच युवा रक्तदाता संघटनेचे मेस्त्री कुटुंबियांनी आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!