फोंड्यात युवकाला 28 हजारांना फसवलं

फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल; तक्रार सायबर सेलल वर्ग

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: फोंड्यात क्रेडिट कार्डवरील खरेदी दाखवून पाटणतळी – बांदोड येथील एका युवकाला 28 हजार 260 रुपयांना गंडवण्याचा प्रकार उघडकीर आला असून याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार सायबर सेलल वर्ग करण्यात आली आहे.

नक्की काय झालं?

उपलब्ध माहितीनुसार तक्रारदार युवक हा वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीत कामाल आहे. कोविड झाल्यामुळे तो गेले ती महिने घरीच होता. हल्लीच तो कामावर रुजू झाला होता. घरी वॉशिंग मशिन नसल्याने त्याने हे मशिन मागवण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला. सुरुवातील दोन हजार रुपये गुगल पे केले आणि संबंधिताने ओटीपी मागितल्यानंतर या युवकाने आपला ओटीपी दिला. मात्र, ओटीपी दिल्यानंतर लगेच 28 हजार 260 रुपये काढल्याचा मेसेज मोबाईलवर आल्याने सदर तक्रारदार युवक चक्रावला.

फोंडा पोलिसात तक्रार दाखल

वॉशिंग मशिन खरेदीसाठी पैसे तयार ठेवले मात्र ते भलत्याच भामट्याने लाटल्याचं लक्षात आल्यावर संबंधित युवकाने फोंडा पोलिसात धाव घेतली. दरम्यान हे प्रकरण सायबर सेलला पाठवण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!