रॉय फर्नांडिसवरील हल्ल्याचा युवा काँग्रेसकडून निषेध

रविवारी 13 एप्रिल रोजी झाला होता हल्ला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: वेर्ला काणका, बार्देश येथील उद्योजक रॉय फर्नांडिस आणि त्यांचे कर्मचारी अग्नी अहमद आणि इमॅन्युएल डिसोझा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा गोवा प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यांनी निषेध केला आहे.

हेही वाचाः रॉय फर्नांडिस यांच्यावर जीवघेणा हल्ला

आम्ही या घटनेचा निषेध करतो

वेर्ला येथील कोमुनिदाद जमिनीवर चालू असलेल्या बेकायदेशीर कामा संदर्भात रॉय फर्नांडिस यांनी तक्रार नोंद केली होती आणि डोंगर कापणी बंद केली होती. जो व्यक्ती आमचे डोंगर आणि पर्यावरणाचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याच्यावरच हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि गुन्हा केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहोत, असे म्हार्दोळकर म्हणाले.

हेही वाचाः CRIME | पतीने केली नवीन गर्लफ्रेंड, रागात पत्नीनं केली सहापैकी पाच मुलांची हत्या

पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्यांचं संरक्षण करा

फर्नांडिस विविध मंचांवर सार्वजनिक प्रश्न उपस्थित करीत असतात. जो व्यक्ती हा डोंगर कापत होता, त्याला फर्नांडिसच्या तक्रारी नंतर काम बंद करावं लागलं. म्हणून सूड घेण्यासाठी हा हल्ला केला गेला आहे. गृह खात्याने हा मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे आणि जे आमच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे हे या घटनेने सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच अशा बेकायदेशीर कारवायांना विरोध करणाऱ्याना लक्ष्य केलं जात आहे, असा आरोप म्हार्दोळकरांनी केला.

हेही वाचाः राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच

किमान गुन्हेगारांची पाठराखण करू नका

जे बेकायदेशीर कृत्य करतात त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. म्हणूनच ते लोकांवर हल्ला करण्याचे धाडस करतात. हे घडत आहे कारण गोवा सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. या असंवेदनशील भाजपा सरकारने पर्यावरणाचा नाश करून गोव्यात तीन प्रकल्पांना परवानगी दिली आणि हजारो झाडे तोडून टाकली. यामुळे या सरकारपासून चांगल्याची अपेक्षा करता येणार नाही. सरकार जर आमच्या नागरिकांना सुरक्षा देऊ शकत नाही, तर किमान गुन्हेगारांची पाठराखण करू नये, असं म्हार्दोळकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!