हवामान खात्याकडून राज्यात यलो, ऑरेंज अलर्ट जारी

आजपासून पुढचे 5 दिवस गोव्याच्या काही भागांत जोरदार पाऊस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात सकाळपासूनच  पाऊस पुन्हा सक्रिय झालाय. राज्यभरात पाऊस बरसतोय. हा पाऊस पुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे बाहेर पडलेल्यांना प्रवास करताना काळजी घेण्यास सांगण्यात आलंय.

हेही वाचाः गोवा किनारी विभाग व्यवस्थापन जनसुनावणीच्या वेळी लोकशाहीचा खून

पुढचे काही दिवस मुसळधार पावसाचे

झारखंड आणि आसपासच्या समुद्रसपाटीपासून ५.८ कि.मी. पर्यंतच्या परिसरामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालीये.  त्यामुळे राज्यात आजपासून काही भागांत जोरदार पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने म्हटलंय. पुढील काही दिवसांत पाऊस सक्रिय होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आलाय. आंध्र प्रदेश-ओडिशा किनारपट्टीवर 11 जुलैच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस वाढण्याची शक्यता असल्याचंही हवामान खात्याने म्हटलंय.

राज्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

आज आणि उद्या (9 आणि 10 जुलै) गोव्याच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज तुरळक ठिकाणी वीजांच्या घडघडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 11 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 12 आणि 13 जुलै रोजी काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. 14 जुलैपर्यंत राज्याच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 11 ते 14 जुलै दरम्यान राज्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात.

यलो आणि ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी प्रत्येकाला एक प्रश्न पडतोच. तो म्हणजो ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे काय? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो? पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं, अशी सुचना जारी करण्यात येते तेव्हा अलो अलर्ट जारी करतात. दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. ऑरेंज अलर्टमध्ये रेड अलर्टपेक्षा थोडी कमी धोकादायक स्थिती असते, पण इथेही यंत्रणांनी सतर्क राहणं गरजेचं असतं. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असतो

हा व्हिडिओ पहाः Video | Rain Alert | ३ दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!