बारावीचा निकाल जाहीर ; मुलींनी मारली बाजी…

बारावीचा एकूण निकाल ९२.६६ टक्के

रजत सावंत | प्रतिनिधी

पणजी : गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 21 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला. बारावीचा एकूण निकाल ९२.६६ टक्के लागला असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.
हेही वाचाःसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच ‘ही’ योजना…

१६,७८३ मुले उत्तीर्ण

परीक्षेत मुलींचा निकाल ९४.५८ टक्के तर मुलांचा निकाल ९०.६६ टक्के आहे. कला शाखा निकाल ९५.६८ टक्के, वाणिज्य शाखा निकाल ९५.७५ टक्के, विज्ञान शाखा निकाल ९३.९५ टक्के. दरम्यान १८,२०१ मुलांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात १६,७८३ मुले उत्तीर्ण झाली आहेत तर १४१८ मुले अनुत्तीर्ण झाली आहेत.
हेही वाचाःबनावट नोटा छापण्यात कुटुंबीयांची ‘साथ’…वाचा सविस्तर

बारावीची परीक्षा दोन सत्रांत

शिक्षण मंडळाने यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांत 18 केंद्रे आणि 72 उपकेंद्रांवर घेतली. या परीक्षेस राज्यभरातून 18 हजार 201 विद्यार्थी बसले होते. कला शाखेमध्ये 4 हजार 754, वाणिज्य शाखेतून 5 हजार 496, विज्ञान शाखेतून 5 हजार 77, तर व्यावसायिक शाखेतून 2 हजार 874 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
हेही वाचाःस्थानिकांसह पर्यटकांनी गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर आंघोळ करु नये, ‘हे’ आहे कारण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!