राँग नंबर ब्रो! आकलेकर म्हणतात, ‘तो मी नव्हेच’

आर्लेकर सोडून आकलेकरांवर शुभेच्छांचा वर्षाव

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: प्रभाकर पणशीकरांचं गाजलेलं नाटक आणि त्यांचा गाजलेला डायलॉग म्हणजे ‘तो मी नव्हेच!’ पण गोव्याच्या अनुशंगाने तो मी नव्हेच हा डायलॉगही चर्चेत आला. गोव्याचे आर्लेकर राज्यपाल होणार म्हणून अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं खरं. पण काहींनी आर्लेकर समजून आकलेकरांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आकलेकरांनी हटके पद्धतीनं राँग नंबर लागलेल्यांनी टोला लगावलाय.

हेही वाचाः लाडली लक्ष्मीच्या लाभधारकांच्या भावनांशी भाजप सरकारचा खेळ

आर्लेकर सोडून आकलेकरांवर शुभेच्छांचा वर्षाव

तो मी नव्हेच! ‘हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन’ असं टॅग करत माझ्यावर अभिनंदनाच्या शब्दसुमनांचा वर्षाव केला जातोय. पण तो मी नव्हेच, असं म्हणत राजेंद्र बी. आकलेकरांनी ट्विट केलंय. मंगळवारी सकाळी राजेंद्र आर्लेकरांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. उत्साहाच्या भरात आणि घाई-गडबडीत काही जणांनी राजेंद्र आर्लेकरांना सोशल मीडियावर टॅग करत शुभेच्छा द्यायचं सोडून राजेंद्र आकलेकरांना टॅग करत शुभेच्छा दिल्यात.

तो मी नव्हेच

तो मी नव्हेच… तो मी नव्हेच… असं प्रत्येकाला सांगताना आकलेकरांची दमछाक झाली. अखेर त्यांनी मी राजेंद्र आकलेकर आहे, राजेंद्र आर्लेकर नाही, असं सांगण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेला ‘तो मी नव्हेच’ असं सांगण्यासाठी ट्विट केलंय. ट्विट करताना आकलेकरांनी लिहिलंय, “हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याबद्दल अभिनंद’ असं टॅग करत माझ्यावर अभिनंदनाच्या शब्दसुमनांचा वर्षाव केला जातोय. तो मी नव्हेच… माझा कोणताही राजकीय कल, संलग्नता किंवा संबंध नाही. माझ्या ट्रेन्स आणि बसेस, इतिहास आणि वारसा यासोबत मी खूश आहे, ” असं आकलेकरांनी ट्विट करताना म्हटलंय.

हेही वाचाः सावधान! क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे हे ‘8’ धोके

कोण आहे राजेंद्र आकलेकर

राजेंद्र बी. अकलेकर हे पेशाने पत्रकार असून त्यांना या क्षेत्रात 25 वर्षांचा अनुभव आहे. सध्या मिड-डे मुंबई वृत्तपत्रात ते वरिष्ठ सहाय्यक संपादकपदी आहेत. भारताच्या रेल्वेचा इतिहास, वारसा आणि ट्रेन्सवरील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पुस्तकांचे लेखक ते आहेत. भारताचे प्रसिद्ध रेल्वे अभियंता डॉ. ई. श्रीधरन यांचे चरित्र त्यांनी लिहिलंय. द डेली, द संडे ऑब्झर्व्हर, हिंदुस्थान टाइम्स, डीएनए, मिड-डे या नियतकालिकांमध्ये त्यांचे असंख्य लेख प्रकाशित झाले आहेत त्यांनी अनेक प्रमुख वृत्तपत्रांमध्ये कामाचा अनुभव घेतला आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Ladli Laxmi | महिला बालकल्याण संचालनालयाच्या ऑफिसात गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!