फ्लॅटमधून ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगावः राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याचप्रमाणे गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही वाढ झालेली पहायला मिळतेय. मडगावातील फातोर्डा भागात असाच एक चोरीचा प्रकार घडलाय. पोलिसी अज्ञात चोराच्या मागावर असून प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचाः फंडपेटी फोडल्याप्रकरणी एकाला अटक
कुठे झाली चोरी?
फातोर्डा येथील नानुटेल हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या इमारतीमधील फ्लॅटमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरांनी बुधवारी रात्री मोबाईल, लॅपटॉप आणि पैशाचं पाकीट मिळून सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी फातोर्डी पोलिसांनी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
हेही वाचाः विहिरीत पडलेल्या तरुणाला जीवदान
बुधवारी रात्री झाली चोरी
फातोर्डा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉलिन कुएलो हा बाणावली येथे राहत असून, त्याच्या बाणावलीत असलेली घराची डागडुजी करण्यात येत असल्यामुळे तो कुटुंबासह फातोर्डा येथे असलेल्या आपल्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आला होता. बुधवारी रात्री उशिरा फ्लॅटचा दरवाजा बंद न केल्याने अज्ञात चोरांनी आतमध्ये प्रवेश केला आणि फ्लॅटमधून पैशाचं पाकीट, लॅपटॉप आणि मोबाईल लंपास केला. सकाळी चोरी झाल्याचं समजल्यावर कॉलिन यांनी पोलिस ठाण्यात येऊन तक्रार नोंद केली.
हेही वाचाः जगाला थक्क करणारी ‘मेडल मशिन्स’
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांना अद्याप कोणतेच धोगेदोरे सापडलेले नाहीत. मात्र चोराला पकडण्याची पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच चोर पोलिसांच्या ताब्यात असेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.