वर्ल्ड फोटोग्राफिक कप – २०२२ः गोंयकार फोटोग्राफर टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणार

फोटोग्राफर्सची ऑलिम्पिक स्पर्धा; देशभरातील फोटोग्राफर्सचा समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोव्याचे फोटोग्राफर रोहन गोज आगामी वर्ल्ड फोटोग्राफिक कप २०२२ मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या फोटोग्राफिक कपमध्ये देशभरातील फोटोग्राफर्सचा समावेश असणार आहे. ही दुसरी वेळ असेल जेव्हा रोहन टीम इंडियाचे कॅप्टन म्हणून टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

हेही वाचाः खूशखबर! Retirement चं वय अन् Pension ची रक्कम वाढण्याची शक्यता

फोटोग्राफर्सची ऑलिम्पिक स्पर्धा

हे फोटोग्राफर्ससाठी ऑलिम्पिकसारखं आहे. प्रत्येक प्रकारात सहा श्रेणी आणि तीन पदके आहेत. सर्वाधिक स्कोअर करणारी टीम ट्रॉफी जिंकते. या वर्षी जास्तीत जास्त नोंदीणी केली जाईल अशी मला आशा आहे, असं रोहन म्हणाले.

अन् त्यांनी इतिहास रचला

डब्ल्यूपीसी२०२१ मध्ये भाग घेण्यासाठी भारताचा राष्ट्रीय टीम तयार करण्यापूर्वी ते युनायटेड एशियन प्रोफेशनल फोटोग्राफर्सचे (यूएपीपी) सदस्य बनले. त्याचबरोबर अधिक व्यावसायिक छायाचित्रकारांना सहभागी करून घेण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टीम इंडियाला नेण्यासाठी ते युनायटेड गोवन फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे (यूजीव्हीपीए) सदस्यही बनले. रोहनने २०२१ मध्ये प्रथमच टीम इंडियाला प्रतिनिधित्व करण्यासाठी घेऊन इतिहास रचला आहे.

हेही वाचाः भीषण! तीन मुलांसह 5 जणांचा टीन शेडमध्ये वीजेचा शॉक लागून मृत्यू

प्रोफेशनल फोटोग्राफर्सना आवाहन

गेल्या वर्षी टीम इंडियाचे कॅप्टन असलेल्या रोहन यांच्याबरोबर स्लेनी मॅकिएल, एरॉन लोप्स परेरा आणि मार्क मिरांडा होते, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारात भाग घेतला होता. यावर्षी त्यांच्यासोबत एरॉन लोप्स परेरा, स्लेनी मॅकिएल, झुमा दत्ता, स्वाती चक्रवर्ती आहेत आणि अधिक प्रोफेशनल फोटोग्राफर्स टीमध्ये सामील होण्याची अपेक्षा रोहत करत आहेत.

२०१७ मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या मेक्सिकन फोटोग्राफरला फॉलो करताना रोहनला या स्पर्धेबद्दल माहिती मिळाली आणि ‘वर्ल्ड फोटोग्राफिक कप’विषयी भारतात माहीत नसल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं.

हा व्हिडिओ पहाः MISSION FOR LOCAL INITIATIVE | मिशन फॉर लोकलनं कोरगावात केली लोकसहभागातुन तळयाची स्वच्छता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!