दिव्यांग, गरोदर महिलांना वर्क फ्रॉम होम

सर्वसाधारण व्यवस्थापन प्रशासनाकडून पत्रक जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: दिव्यांग आणि गरोदर महिलांनी घरातून काम केलं तरी त्यांची हजेरी लावली जाणार असल्याचं पत्रक सर्वसाधारण व्यवस्थापन प्रशासनाने काढलं आहे. महामारीच्या काळात त्यांना संसर्गाचा धोका अधिक असल्यानं हा नियम लागू केला आहे. काही गरोदर महिलांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्याची मागणी केली होती. कोरोनानाबतचे नियम आणि एसओपीचे गांभीर्याने पालन करण्यासाठीच्या सूचना या पत्रकात दिल्या आहेत.

हेही वाचाः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोवा संघचालकपदी राजेंद्र भोबे

दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम

राज्यात कोरोनाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत विविध कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तथापि, आता यात अजून एक बदल करण्यात आलाय. दिव्यांगांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट देत घरातून कामकाजाची (वर्क फ्रॉम होम) मुभा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. याद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा संबंधित विभाग/आस्थापनांनी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशित करण्यात आले आहे. असे करताना कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होणार नाही याकडेही लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचाः आज, उद्या तुरळक सरी

गरोदर महिलांनादेखील घरून काम करण्याची मुभा

त्याचप्रमाणे गरोदर महिलांनादेखील वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात आलीये. गरोदर महिलांच्या गर्भाशयात वाढणाऱ्या नवीन जीवाला कोणताही धोका निर्माण होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!