महिलेवर बलात्कार; हॉटेल चालकास अटक

गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध उचलला फायदा; १९ नोव्हेंबरची घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: जेवणात गुंगीचे औषध टाकून महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी सुमेश पी. ए. (४२, मूळ कन्नूर केरळ) या हॉटेल चालकास अटक केली आहे. हा प्रकार १९ रोजी रात्री ११ च्या सुमारास शिरसई येथे घडला होता.

१९ नोव्हेंबरची घटना

संशयित ७ वर्षांपासून थिवी रेल्वे स्थानकानजीक हॉटेल चालवत आहे. या हॉटेलमध्ये ही घटना घडली. १९ रोजी आपण हॉटेलवर गेल्यावर संशयिताने जेवणाचा आग्रह केला. जेवल्यानंतर आपली शुद्ध हरपली. याचा फायदा घेऊन संशयिताने बळजबरी केली, असं फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद केला असून संशयितास अटक केली आहे.

कोलवाळ पोलिसांकडे प्रकरण वर्ग

दरम्यान, पीडितेने तक्रार हणजूण पोलिसांत नोंदवली होती; पण घटना कोलवाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्यामुळे प्रकरण कोलवाळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!