हिमालयाची उंची, समुद्राची खोली यांचा समन्वय राखून कार्य करणार

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांचं प्रतिपादन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः राज्यात समुद्रकिनारी राहणारा मी, अचानक एके दिवशी माझ्या स्वप्नी हिमालयाचं दर्शन होतं आणि सीमेवर जाऊन सैनिकांच्या हातावर राखी बांधत असल्याचं दिसतं. ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. येत्या आठ दिवसात मी राखी घेऊन हिमाचल प्रदेशच्या सीमेवर, चायना बॉर्डरवर असलेल्या सैनिकांच्या हातावर जाऊन बांधणार आहे. समुद्राची खोली आणि उंच हिमालय या दोघांचं समन्वय राखून मला हे देशहिताचं कार्य करायचं आहे, असं प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी काढले. नागझर पेडणे येथील शारदा उच्चमाध्यमिक विद्यालय आणि चैतन्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक राखी सैनिकासाठी’ या उपक्रम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचाः म्हावळिंगे-डिचोलीत पोलिसांनी उधळला पट जुगाराचा डाव

या कार्यक्रमाला उच्चमाध्यामिक विद्यालयाचे व्यवस्थापक श्रीधर शेणवी देसाई, प्रताप भेंडाळकर, इंडियन आर्मीची मोहंती, कमांडर प्रियमवदा सिंग परी, नेव्हीचे चीफ ऑफिसर अनंत जोशी, प्रा. गजानन मराठे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसंच राज्यभरातील विविध हायस्कूलमधून आलेल्या १० दहा हजार राख्या यावेळी राज्यपाल आर्लेकरांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

निष्ठेने काम करा, देशप्रेम जागवा

कोणतंही काम निष्ठेने, प्रेमाने आणि राष्ट्रीय भावनेने करा. आतापर्यंत आपण जे काम केलं, ते राष्ट्रीय भावनेने, भारतीय जनता पार्टीचं काम म्हणून केलं. काम करताना मी निष्ठा ठेवली. म्हणूनच मी केलेल्या कामाची दखल ही राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. आणि मला राज्यपालपदी विराजमान होण्याचा मान मिळाला, असं आर्लेकर म्हणाले.

हेही वाचाः निवृत्त न्यायाधीश डॉ. गुस्तांव फिलीप कुटो यांंचं निधन

राखीचा धागा सैनिकाचे पाठबळ

आज आम्ही मनमोकळेपणाने जे कार्यक्रम करतो, ते केवळ सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांमुळे. त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या मनात आदर आणि सन्मान असायला हवा. त्यांना एकदा तरी आम्ही सलाम करायला हवा. आम्ही त्यांचं स्मरण करत असतानाच आमचा एक राखीचा धागा त्या सैनिकांच्या मनगटावर बांधला जाईल, तेव्हा त्या सैनिकाना १० हत्तीचं बळ मिळेल. राखी हा एका धागा नसून, ते राष्ट्रीय बंधन असल्याचं आर्लेकरांनी सांगितलं.

देशाची ताकत युवा पिडीत

देशाची ताकत या युवा पिढीत आहे. त्यामुळे देशप्रेम जागवणं आणि प्रेरणा घेऊन काम करणं आवश्यक आहे. प्रत्येक युवकाने देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण या भूमीचं देणं लागतो. त्यामुळे ती जाणीव ठेवून प्रत्येकाने वागावं.

हेही वाचाः तीन यात्रा, तीन नेते, अन् एक ध्यास

यावेळी भारतीय सेनेचे हवालदार मोहंती आणि अनंत जोशी यांची भाषणं झाली. गजानन मराठे यांनी प्रास्ताविक केलं, तर साईशा परब यांनी सूत्रसंचालन केलं.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | GOA FORWARD| गोवा फॉरवर्डच्या बैठकांचा धडाका सुरू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!