रिकार्डो भाजपात जाणार की एनसीपीत?

भाजप मुख्यालयानंतर आता शरद पवारांची भेट!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः रिकार्डो डिसोझा हे नावं गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आलंय. टिटोजचे मालक म्हणून प्रसिद्ध असलेले रिकार्डो डिसोझा यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या हायकमांडची भेट घेतल्याचं वृत्त ताजं असताना आता त्यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) चीफ शरद पवारांची भेट घेतल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

हेही वाचाः खूशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना २८ टक्के डीए लागू

रिकार्डो भाजपात जाणार की एनसीपीत?

रिकार्डो यांनी दिल्लीत जाऊन पवारांची भेट घेतल्यानंतर गोव्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. दरम्यान रिकार्डो यांनी त्यांच्या या भेटीमागचं कारण जरी स्पष्ट केलेलं नसलं, तरी या भेटीचे विविध तर्क वितर्क काढले जातायत. या भेटीनंतर आता रिकार्डो एनसीपीत जाणार अशा चर्चांना गोव्याच्या राजकीय वर्तुळात उधाण आलंय. तर दुसरीकडे रिकार्डो भाजपात जातायत की एनसीपीत याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय.

हेही वाचाः ACCIDENT | गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू

काही दिवसांपूर्वी घेतली होती भाजपच्या हायकमांडची भेट

नुकतील 27 जुलै रोजी रिकार्डो यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या हायकमांडची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीनंतर त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजलं होतं. या वृत्ताची पडताळणी करण्यासाठी ‘गोवन वार्ता लाईव्ह’चे संपादक किशोर नाईक गावकर यांनी रिकार्डो डिसोझा यांच्याशी फोनवर बातचीत केली होती. तेव्हा त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचं नाकारलेलं नव्हतं. मात्र भाजप हायकमांड यावर लवकरच माहिती देईल आणि त्यानंतरच मी यावर बोलेन असं ते म्हणाले होते. तसंच गोव्याला स्वच्छ करण्यासाठी, गोव्याची प्रतिमा सुधारण्यासाठी गोव्याच्या राजकारणात मला उतरावं लागलं तर मी नक्कीच उतरणार, असंही ते म्हणाले होते.

हेही वाचाः या आहेत त्या १० गोष्टी ज्यावर पावसाळी अधिवेशनात गाजणार

आता या सगळ्याच पार्श्वभूमीवर रिकार्डो कुठल्या पक्षात प्रवेश करतात, प्रवेश केलाच तर कुठून निवडणूक लढवतात, राजकारणात प्रवेश करतात की नाही, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तर येणारा काळच देईल. दरम्यान याविषयातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा ‘गोवन वार्ता लाईव्ह’ची वेबसाईट..

हा व्हिडिओ पहाः Video | Government Employee | Good News | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही २८% डीए

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!