मोरजीतील कुडाळकर, कार्दोज कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार

मांद्रेचे काँग्रेसचे युवा नेते सचिन परबांची ग्वाही

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मोरजीतील कुडाळकर, कार्दोज कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार करणार असल्याचं मांद्रेतील काँग्रेसचे युवा नेते सचिन परब म्हणालेत. तौक्ते चक्रीवादळात मोरजी पंचायत क्षेत्रातील ध्रुव कुडाळकर, डॉमनिक कार्दोज आणि इनास कार्दोज यांच्या घरावर आंब्याचे आणि नारळाची झाडे पडून किमान वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय. कुडाळकर कुटुंबियांचं घर तर धोकादायक स्थितीत आहे. भलं मोठं आंब्याचं झाड त्यांच्या घरावर कोसळून घराचं छप्पर गेलं, भिंती कोसळल्या. सुदैवाने घरातील मंडळी वाचली. कुडाळकर कुटुबियांचं किमान 12 लाख रुपयांचं, तर कार्दोज कुटुंबियांचं 8 लाखांचं नुकसान झालंय.

सचिन परबांनी घेतली कुडाळकर, कार्दोज कुटुंबाची भेट

जवळपास तौक्ते चक्रीवादळ येऊन गेल्यास 15 दिवस झाले. मात्र सरकारी यंत्रणेतील कुणीच या कुटुंबियांच्या मदतीला आलं नाही. घरावर पडलेलं झाड आठ दिवसांनंतर क्रेन आणून काढलं गेलं. कुडाळकर कुटुंबियांना आता आसराच उरलेला नाही. अशा परिस्थितीत मांद्रेतील काँग्रेसचे युवा नेते सचिन गोपाळ परब या कुटुंबियांच्या मदतीला धावून आलेत. मधलावाडा मोरजीतील कुडाळकर आणि कार्दोज कुटुंबियांच्या घरी भेट देऊन परबांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली, या कुटुंबियांची कैफियत ऐकून घेतली.

जमेल तशी मदत करणार

सचिन परब यांनी कुडाळकर तसंच कार्दोस यांच्या घराची झालेली वाताहत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. कुडाळकर कुटुंबियांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घराचं छप्पर आणि भिंती उरल्या नाहीत. त्यामुळे त्यांना जमेल तशी मदत करण्याचं आश्वासन दिलं. गरजूला मदत करणं हीच माझ्या दृष्टीने माणूसकी असल्याचं परब यांनी यावेळी सांगितलं.

सामाजिक बांधिलकी जपून कार्य करणं हेच समाजकारण

आपत्कालीन यंत्रण या कुटुंबियांच्या मदतीला पोहोचली नसल्यानं त्याविषयी परबांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपून कार्य करणं हेच समाजकारण आहे. तो अमूक एका पक्षाचा, तो माझा समर्थक नाही हा भेदाभेद मी कधीच करत नाही. ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत मी करतो, असं परबांनी यावेळी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!