Goa Politics | गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलिन करणार?

पक्ष विलिनीकरणाबाबत सूचक वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : स्वतःचा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करणे सोपी गोष्ट नाही. काँग्रेसकडून मला अजून तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास विचार करू, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
हेही वाचा:धक्कादायक : ‘पार्थ’ जहाजातून तेल गळती, गोव्यातील समुद्र किनाऱ्यांना बसणार फटका…

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चाही झालेली आहे

गोवा फॉरवर्ड पक्षाचे लवकरच काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊन विरोधी पक्षनेतेपदी विजय सरदेसाई यांची नियुक्ती होऊ शकते. त्यासंदर्भात सरदेसाई आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चाही झालेली आहे, असे वृत्त ‘गोवन वार्ता’ने मंगळवारी प्रसिद्ध केले. त्यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली. पत्रकारांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी संपर्क साधल्यास, एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करणे सोपे नसते. परंतु, विलिनीकरणाबाबत काँग्रेसकडून अधिकृत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याने त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे.
हेही वाचा:SPORT | वर्ल्ड कॅडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत ‘गोव्याचा’ एथन वाझची चमकदार कामगिरी…

भविष्यात पक्षाला मोठा फायदा मिळेल

काँग्रेस श्रेष्ठींकडून तसा प्रस्ताव आल्यास विचार करण्यास हरकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
विजय सरदेसाई यांच्या या स्पष्टीकरणानंतर पत्रकारांनी काँग्रेस आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांना याबाबत विचारले असता, विजय सरदेसाई मूळचे काँग्रेसचेच आहेत. शिवाय त्यांची आणि काँग्रेसची विचारधाराही सारखीच आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये आल्यास पक्षाला आणखी बळकटी मिळेल. त्याचा भविष्यात पक्षाला मोठा फायदा मिळेल. यासंदर्भात आपण वैयक्तिक सरदेसाई यांच्याशी चर्चाही करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा:SHOCKING | कॉमेडीचा बादशाह गेला, राजू श्रीवास्तव यांचे निधन

तीनच आमदार उरल्याने विरोधी पक्षनेतेपदही निसटले

दरम्यान, अकरापैकी आठ आमदार भाजपात गेल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. केवळ तीनच आमदार उरल्याने विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसच्या हातून निसटले आहे. अशा स्थितीत गोवा फॉरवर्डचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करून विजय सरदेसाई यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देऊन भाजपचा सामना करण्याचे आणि काँग्रेसला बळकटी देण्याचे काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी ठरवले आहे. यावर सध्या चर्चा सुरू असून, ऑक्टोबरपर्यंत यावर शिक्कामोर्तबही होण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसमधील गोपनीय सूत्रांनी दिली.
हेही वाचा:‘कामचुकार’ सरकारी कर्मचाऱ्यांना थेट ‘घरचा रस्ता’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!