गोवा निवडणुकीत पूर्ण सहाकार्य करणारः किशोरी पेडणेकर

शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी घेतलं मुंबई महापौर यांच्या बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत आणि सरचिटणीस मिलिंद गावस यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्यावर श्री गणपतीचं दर्शन घेतलं. सोबत गोवा संपर्क प्रमुख जीवन कामत उपस्थित होते.

गोव्यातील एकूण राजकीय परीस्थितीचा घेतला आढावा

यावेळी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी गोव्यातील एकूण राजकीय परीस्थितीचा आढावा घेतला. गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय वाटा घेण्याची विनंती कामत यांनी केली. मूळ गोंयकार असलेल्या किशोरीताई यांचा संघटनात्मक आणि राजकीय अनुभव तगडा असून महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्यास उपयुक्त ठरेल असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला आहे.

गोवा निवडणुकीत पूर्ण सहाकार्य करणार

कोविड काळात स्वतः नर्सचा गणवेश परिधान करून रुग्णालयात रूग्णांची निस्वार्थी सेवा करण्यावरून किशोरीताई महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि पूर्ण देशात लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचाही पक्षाला गोव्यात नक्कीच फायदा होईल. गोवा निवडणुकीत पूर्ण सहाकार्य करणार असल्याचं आश्वासन त्यांनी कामत यांना दिलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!