शेतीला प्राधान्य देण्यासाठी सदैव प्रयत्न करणार

आमदार दयानंद सोपटेंचं प्रतिपादन; मोरजीत केलं मोफत बियाणं आणि खत वाटप

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे मतदारसंघातील जनतेने परत एकदा मला संधी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला आहे. याही पुढे शेतीसाठी सर्वतोपरी मदत करणार. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेताना पडीक शेतातून मोत्यासारखी कणसं पिकवून शेतीद्वारे क्रांती करावी, असे आवाहन आमदार दयानंद सोपटेंनी मोरजी येथे शेतकऱ्यांना मोफत बियाणं आणि खत वाटप करताना केलं. गावडेवाडा मोरजी येथील सुचिता शिरोडकर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सरपंच वैशाली शेटगावकर, पंच सुप्रिया पोके, महिला मोर्चा अध्यक्ष नयनी शेटगावकर, माजी सरपंच धनंजय शेटगावकर, दया कोरगावकर, लक्ष्मिकांत कोरगावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचाः उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांकडून केपे मतदारसंघात चेनसॉ यंत्रांचे वितरण

एकूण 2850 शेतकऱ्यांना दिलं मोफत भात आणि खत

मांद्रे मतदारसंघातील केरी, हरमल, पालये, मांद्रे, मोरजी, आगरवाडा,पार्से, तुये या आठ पंचायत क्षेत्रातील एकूण 2850 शेतकऱ्यांना मोफत भात आणि खत वितरीत केलं आहे, असं सोपटे म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन सोपटेंनी केलं.

शेतीला प्राधान्य

शेती हा उत्तम व्यवसाय आहे. शेतीद्वारे हरित क्रांती होऊ शकते. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना राबवतेय. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. मीदेखील शेतीला प्राधान्य देण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजना आणि त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असं सोपटे म्हणाले.

हेही वाचाः पर्यावरण रक्षणार्थ गोवा वन खात्याचं योगदान मोलाचं

शेतकऱ्यांना मदत

मांद्रे मतदार संघातील केरी, पालये, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, पार्से, तुये, विर्नोडा या नऊही पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोफत प्रत्येकी 50 किलो खत आणि 25 किलो ज्योती बियाणं देण्याची योजना राबवली आहे. मतदार संघातील किमान 2850 शेतकऱ्यांना योजना मिळवून दिली आहे.  मांद्रे आणि केरी भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. आमदार दयानंद सोपटेंनी आपल्या आमदारकीच्या मासिक मानधनातून शेतकऱ्यांसाठी भात आणि खत मोफत देण्याची योजना मागच्या दोन वर्षांपासून राबवली आहे.

या पुढे भात मळणी, नांगरणी यासाठीही सर्वतोपरी मदत करणार आहे. मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर आणि माजी सरपंच धनंजय शेटगावकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!