धनगर समाजातील घरांना आजपर्यंत वीज का नाही मिळाली?

गिरीश चोडणकरांचा मांद्रेच्या आमदारांना सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे जर काँग्रेसचा त्याग करून भाजप सरकारात गेले, तर मग त्यांनी आपल्याच मतदारसंघातील तुये येथील चार धनगर समाजातील घरांना वीज, पाणी, रस्ते या सोयी का उपलब्ध करून दिल्या नाहीत, असा संतप्त सवाल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपस्थित केला. तुये येथील चार धनगर समाजाच्या घरात ९० वर्षानंतर वीजेचे बल्ब मांद्रेचे युवा काँग्रेस नेते सचिन परब यांच्या मार्फत देण्यात आले. ९० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर या घरात दिवे पेटल्यावर या कुटुंबांतील मंडळींच्या चेहऱ्यावर जे हास्य दिसलं ते पाहण्याजोगं होतं.

हेही वाचाः नयनरम्य दृष्य! रेल्वेवर पसरली पाणी अन् ढगांची पांढरी चादर

कार्यकर्त्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला युवा काँग्रेस नेते सचिन परब, माजी मंत्री संगीता परब, काँग्रेस महिला अध्यक्ष बिना नाईक, वरद म्हार्दोळकर, नारायण रेडकर, उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके, रेखा महाले, आनंद शिरगावकर, लक्ष्मिकांत शेटगावकर, अनिता वाडजी, सरपंच सुहास नाईक, पंच आनंद साळगावकर, माजी सरपंच किशोर नाईक आदी मंडळी उपस्थित होती.

काँग्रेस पक्ष हा गरिबांपर्यंत पोचणारा पक्ष

काँग्रेस पक्ष हा गरिबांपर्यंत पोचणारा पक्ष आहे. सरकारने ठरवलं असतं तर या घरापर्यंत कधीचीच वीज पोहोचली असती. त्यांच्याकडे ती एजन्सी आहे, मात्र सरकारला त्यांचं पडलेलं नाही. सचिन परब यांनी या गरीब कुटुंबियांना वीजेची सोय करून देऊन सरकार, मुख्यमंत्री, स्थानिक आमदार दयानंद सोपटे आणि धनगर समाजाचं प्रतिनिधीत्व करणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची लक्तरं वेशीवर टांगली असल्याचा दावा चोडणकरांनी केला.

हेही वाचाः एम्क्युअर फार्माने बळकट केले आपले संचालक मंडळ

आमदाराने स्वतःला विकलं

काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे, जे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांचा पराभव करून जाईंट किलर ठरले होते, त्यांनी स्वतःला दिल्लीत करोडो रुपयांना विकलं. त्यामुळे त्यांना गरीबांचा कळवला नाही. जो स्वतःला विकतो तो गरीबांचा विकास कसा करणार, असा सवाल चोडणकर उपस्थित केलाय.

हेही वाचाः बाणावली लैंगिक अत्याचार प्रकरणः सहभागी सरकारी कर्मचारी सेवेतून निलंबित

काँग्रेस पक्ष गरिबांच्या विकासाठी प्रयत्नशील

काँग्रेस पक्षाने आतापर्यंत गरिबांच्या विकासाठी प्रयत्न केले. काँग्रेस पक्षाचं बळ दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी काँग्रेस आमदारांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, तेच आमदार आज भाजपात आहेत. त्यामुळे ते आता भाजपची बी टीम आहेत. काँग्रेस स्वच्छ झालंय. आता भविष्यात काँग्रेसची धुरा युवा कार्यकर्त्यांकडे जात आहे. त्यामुळे काँग्रेसने आगामी निवडणुकीत मांद्रेतून युवकांना संधी द्यावी, असं माजी मंत्री संगीता परब यांनी बोलताना म्हटलंय.

भाजप हे श्रीमंतांचं सरकारः बिना नाईक

भाजप हे श्रीमंतांचं सरकार आहे. त्यामुळे त्यांचं गरिबांकडे लक्ष नाही. आज दिवे पेटवून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे. या धनगर वस्तीपासून दोन किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रोनिक सिटी येत आहे, तर चार किलोमीटर अंतरावर आमदार सोपटे यांचं घर. मग ही अंधारात असलेली कुटुंब आमदार दयानंद सोपटेंना कशी काय दिसली नाहीत, असा सवाल महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी उपस्थित केला.

हेही वाचाः किर्लोस्कर बंधूतही भाऊबंदकीचा वाद

मी कधी मतांची गणितं केली नाहीः सचिन परब

मी कधी मतांची गणितं केली नाही, किंवा राजकीय लाभ उठवण्यासाठी दिवे पेटवले नाहीत. गरिबांच्या घरात दिवे पेटतात यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला नाही. या कुटुंबियांना सर्व त्या सोयी पुरवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असं काँग्रेसचे युवा नेते सचिन परब म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | GOVIND GAUDE | मंत्री गावडे म्हणतात, सरकारी मदत म्हणजे भीक नव्हे, कलाकारांचा सन्मान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!