दगडफेक, लाठीचार्जनंतरही सत्ताधारी आणि विरोधक गप्प का?

मंगळवारी आग भडकली, बुधवारी दगडफेक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारी रात्रीपासून गोव्यात मेळावलीचं आंदोलन पेटलंय. पोलिस बळाचा वापर करत हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप होतोय. मात्र या सगळ्यांत एक गोष्ट प्रामुख्यानं अधोरेखित होताना दिसतेय. ती म्हणजे मंगळवारी झालेल्या आंदोलनानंतरही सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनी या संपूर्ण घटनेवर मौनच बाळगलंय.

आताच हाती आलेल्या माहितीनुसार, शेळ-मेळावलीतून पोलिसांनी माघार घेतलीय. आंदोलक मात्र घटनास्थळी ठाण मांडून बसलेत. सरकारच्या जबरदस्तीचा सर्व थरांतून निषेध केला जातोय.

कुणीच बोलत का नाही?

राज्यात काही महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका लागणार आहेत. तर दुसरीकडे कोणत्याही क्षणी पालिका निवडणुका जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर कुणीच काही बोलायला तयार नाही का?, असाही प्रश्न उपस्थित होतोय. मंहळवारी तणावपूर्ण वातावरणात मेळावलीतील ग्रामस्थांचा विरोध डावलून सर्वेक्षणाचं काम करण्यात आलं. आंदोलकांना चकवून हे काम केलं गेलं. सलग दुसऱ्या दिवशीही मेळावलीत तणाव कायम आहे. आता तर या आंदोलनानं हिंसक रुप घेतलंय. मात्र तरिही राज्यातील सर्वच राजकीय प्रतिनिधी मूग गिळून गप्प का बसलेत, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

आपचं एक ट्वीट आणि क्रांतीचा मेसेज

आपनं मेळावलीतील आंदोलनावर एक ट्वीट केलंय. त्या व्यतिरीक्त क्रांतीकारी आशयाचा एक मेसेज वायरल करण्यात आलाय. यात मेळावलीवासियांच्या बाजूने भक्कपणे उभं राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यापलिकडे कुणीही या संपूर्ण घडामोडींवर बोलण्यास आणि या आंदोलनाची दखल घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एकाकीपणे लढा देणाऱ्या मेळावलीतील लोकांचा आक्रोश यामुळेच वाढला असून हे आंदोलन आता चिघळत असल्याचं पाहायला मिळतंय.

बुधवारी काय घडलं?

बुधवारीही आंदोलकांनी तीव्र निदर्शनं केलीत. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. दगडफेकही झाली. यात १० पोलिस जखमी झालेत. यानंतर आंदोलकांची धरपकड करण्याचाही प्रयत्न झाला. महत्त्वाचं म्हणजे आंदोलकांनी या सगळ्यानंतरही माघार घेतलेली नाही. त्यांनी आपला लढा सुरुच ठेवलाय. पोलिसांसमोर झोपून त्यांनी आयआयटीविरोधात संघर्ष सुरुच ठेवलाय. दुसरीकडे लाठीचार्जसोबतच अश्रूधुराचाही वापर करण्यात करण्यात. तर दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांवर वाळपईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दगडफेक, लाठीचार्जनंतर आंदोलक महिलांनी काय केलं? पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!