‘कोण मनोज परब, मला नाही माहीत’

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचा टोला

देविदास गावकर | प्रतिनिधी

वाळपई : पालिका निवडणुकांचा निकाल लागला. भाजपनं एक पालिका सोडली तर सगळीकडेच मुसंडी मारली. वाळपई पालिकेत पुन्हा एकदा राणेंची ताकद दिसून आली. यात महत्त्वाचं म्हणजे विश्वजीत राणेंनी पालिकेती राणे समर्थकांच्या विजयानंतर मतदारांचे आभार मानले. प्रलंबित कामं आणि दिलेली आश्वसनं पूर्ण करणार असल्याचं म्हटलं. तसंच निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करत कौतुकही केलं.

‘मला नाही माहीत’

पत्रकारांशी संवाद साधत असतानाच विश्वजीत राणे यांनी कोरोना, राजकारण, पालिका निवडणुकांचे निकाल यावर भाष्य केलं. दरम्यान, याचवेळी गोवनवार्ता लाईव्हच्या प्रतिनिधींनी सध्या वाळपईत सुरु असलेल्या रिव्हॉल्यूशनरी गोवन्सच्या दारोदारी जाऊन केल्या जाणाऱ्या प्रचारावर प्रश्न विचारला. त्यावेळी विश्वजीत राणेंनी दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मनोज परब कोण आहे? मला माहीत नाही, असं म्हणत त्यांनी पलटवार केला.

प्रचार करण्यापेक्षा काम केलेल्यांनाचा लोकं निवडणुकीच निवडणून देतात, असा टोलाही यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी लगावलाय. सध्या आरजीचं दारोदारी जाऊन कॅम्पेनिंग करण्याचं काम सुरु आहे. राज्यातील तरुणाईचा वाढता पाठिंबा पाहता आरजीबाबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंना सवाल करण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावर चर्चांना उधाण आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!