गोव्यात अनलॉक प्रक्रिया कधीपासून? मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘ही’ तारीख

पर्यटन सुरु कधी होणार याकडे लक्ष

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केली. या घोषणेचं मुख्यमंत्र्यांनी स्वातगही केलं. दरम्यान, याचवेळी आता राज्यात 14 जूनपर्यंत वाढवण्यात आलेला कर्फ्यू आणि कडक निर्बंध यात शिथिलता केव्हा दिली जाणार आणि राज्यात अनलॉकची प्रक्रिया केव्हा सुरु होणार, याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. अशातच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिलेत.

सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी लसीकरणाच्या विषयावरुन आणि गोव्याच्या एकदंरीत परिस्थितीबाबत राष्ट्रीय माध्यमांशी मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री गोव्याच्या स्थितीची माहिती दिली. त्यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अनलॉक कधी करणार, याचंही उत्तर दिलंय.

हेही वाचा : भाजप सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच

15 जूननंतर अनलॉक?

14 जून सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात कर्फ्यू आहे. दरम्यान, राज्यातील निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय 15 जून पासून घेतला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणालेत. 15 तारखेनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र येत्या दोन महिन्यात भरपूर काळजी घ्यावी लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मात्र या सगळ्यात 30 जून पर्यंत कोरोना लसीचा पहिला डोसचं 100 टक्के लसीकरण करण्याचं ध्येस सरकारचं अशल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतरही पर्यटन आणि राज्यातील इतर गोष्टी सुरु करण्याबाबत विचार केला जाऊ शकेल, असं डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलंय.

आणखी काय म्हणाले?

दरम्यान, कोरोना लसीकरणासोबतच येत्या काळात खबरदारी बाळगणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. त्यासोबतच गोव्यातील कोरोना रुग्णवाढ आता नियंत्रणात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. महत्त्वाचं म्हणजे गोव्याचा रिकव्हरी रेट वाढला असून रुग्णवाढीचं प्रमाण घटलंय. सक्रिय रुग्णांची संख्याही घटतेय. लोकसंख्या कमी असल्यामुळे राज्यातील लसीकरण शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं, यालाच सध्याच्याघडीला प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना दिली.

हेही वाचा : CORONA UPDATE | दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट वाढतोय

रुग्णवाढ घटली

राज्याच्या आरोग्य खात्याने जारी केलेल्या बुलेटिननुसार सोमवारी राज्यात नवे कोरोनाबाधित सापडण्याचं प्रमाण 500 च्या आत आहे. रविवारी 418 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झालीये. यातील  349  जणांनी होम आयझोलेशन स्विकारलं असून 69  जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. सध्या राज्यात 6 हजार 397 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा : करोनावरील उपचारांसाठी इव्हर्मेक्टिन, डॉक्सिसाईक्लिन औषधांचा वापर थांबवा

पाहा मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या तरुणाची कथा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!