वादळ-वारा नसताना वीज होते गुल!

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी
पेडणेः चांदेल-हसापुर आणि कासारवर्णे या भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होणाऱ्या समस्येविषयी पेडणे वीज सहाय्यक अभियंते वाटू सावंत यांच्याकडे पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे निजी सचिव ज्ञानेश्वर परब आदींनी सविस्तर चर्चा केली. त्यावर सहाय्यक अभियंते वाटू सावंत यांनी वीज समस्येविषयी प्रक्रिया सुरू केली आहे. वारंवार फिडर ट्रीप होत असल्याने ही समस्या होत असल्याने सध्या त्यावर तात्पुरती सोय केल्याचं सांगितलं.
हेही वाचाः साखळी मतदार संघातील पायलटना मुख्यमंत्र्यांकडून रेनकोट
वादळ-वारा नसताना वीज होते गुल
पेडणे तालुक्यात वादळ वारा पाऊस नसतानाही वीज गायब होण्याचे प्रकार घडत असतात. वीज खाते मान्सून पूर्वच नव्हे, तर अधून मधून आपल्या अधिकाराचा वापर करून अर्धा दिवस वीज पुरवठा खंडीत करते. त्यावेळी जुन्या वाहिन्या, वीज खांब बदलण्याचे काम केलं जातं. शिवाय वीज वाहिन्यांवर झाडांच्या आलेल्या फांद्या छाटणं अशी कामं केली जातात. तरीही वादळ वारा नसताना वीज गुल होण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ आहे.
हा व्हिडिओ पहाः Crime | Gang war | ताळगावातील ४ जूनचा हल्ला म्हणजे गँगवॉरच!
वीज वाहिन्यांवर असलेल्या झाडाच्या फांद्या छाटाव्यात
वारंवार वीज पुरवठा खंडीत होणाऱ्या प्रकारावर आळा घालावा अशी मागणी पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावास यांनी केली. त्यांनी सांगितलं वीज फिडर निकामी बनत असल्याने हा प्रकार घडतो, अनेक वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या आहेत. त्या फांद्या छाटाव्यात, अशी त्यांनी मागणी केली.
हेही वाचाः CORONA UPDATE | सोमवारी कोविड बळींचा आकडा एक अंकी
चांदेल पाणी प्रकल्पावर विपरित परिणाम
पेडणे तालुक्यात वारंवार वीज खंडीत होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम चांदेल पाणी प्रकल्पावर होत आहे. वीजेचा लपंडाव जेवढा वाढतोय त्याच गतीने जनतेला पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागतेय. पेडणे तालुक्यातील वीज प्रवाह खंडित होत असल्याने चांदेल पाणी प्रकल्पातून जनतेला पाणी मिळत नाही. 24 तास पाणी पुरवठा करण्याची घोषणा सरकार करत असताना आज पेडणे तालुक्यात दिवसाला 2 तासही नियमित पाणी मिळत नाही. पाणी विभाग वेगवेगळी कारणं सांगून जनतेला फसवण्याचं काम करत आहे. आम्हाला पाणी द्या म्हणून जनता लोकप्रतिनिधी मंत्री यांच्याकडे मागणी विनवणी करतात. मात्र त्यांनाही यश मिळत नाही. दररोज वीजेचा लंपडाव चालू असल्यानं पाण्याचाही नित्याचाच खेळ सुरू आहे.
हेही वाचाः कंत्राटावर दिलेल्या टॅक्सींना डिजिटल मीटरची सक्ती
हरमल गावासाठी मांद्रे जवळच्या वीज फिडरवरून वीज प्रवाह द्यावा
हरमल आणि मतदारसंघात वारंवार जसा पाण्याचा लंपडाव आहे तसाच वीजेचा लपंडाव सुरू आहे. हरमल भागासाठी वीजेचा फिडर केरीला आहे. तिथे बिघाड झाला तर केरी, पालये आणि हरमल या तीन गावांना फटका बसतो. आणि ११ केव्ही लाईन ही रानावनातून आली आहे. ती रस्त्याच्या बाजूने आणायला हवी. नाहीतर वीज खात्याने हरमल गावासाठी मांद्रे जवळच्या वीज फिडरवरून वीज प्रवाह द्यावा. ही वीज समस्या कायमची मिटवण्यासाठी किनारी भागात भूमिगत केबल घालून सोय करावी, शिवाय मांद्रे मतदारसंघात पाणी आणि वीजेचा जो लपंडाव सुरु आहे, त्याविषयी एकदा तरी दोन्ही खात्याच्या मंत्र्यांनी मांद्रेत येऊन पहावे, अशी मागणी हरमलचे पंच तथा सामाजिक कार्यकत्ये प्रवीण वायंगणकर यांनी केली.