‘दिल्लीत काय चाललंय ते माहीत नसणारे गोव्यात काय करणार?’

रिव्होल्यूशनरी गोवन्सच्या मनोज परबांचा टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जर त्यांच्या दिल्लीत चर्चची मोडतोड झाल्या प्रकाराविषयी माहीत नाही, तर ते गोव्यात काय करतायत, असा सवाल रिव्होल्यूशनरी गोवन्सच्या मनोज परबांनी केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा प्रश्न विचारलाय.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. बुधवारी सकाळी पणजीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांनी दिल्लीत चर्च जमिनदोस्त केल्या प्रकारावर तुमची भूमिका काय आहे, असा प्रश्न विचारला असता केजरीवाल म्हणाले, हे काम ‘डीडीए’कडून करण्यात आलं आहे. ‘डीडीए’ केंद्र सरकार अंतर्गत येतं. दिल्ली सरकारचा यावर कंट्रोल नाही. ‘डीडीए’ हायकोर्टात गेलं आणि त्यांनी दिलेल्या ऑर्डरनुसार ही कारवाई करण्यात आली. आमचे तिथे स्थानिक आमदार त्याविषयात लक्ष घालतायत. त्यांना लागेल ती मदत करत आहेत.

योग्य तो न्याय करेन

याविषयातील कायदेशीर शक्यता मला माहीत नाही. काल मी गोव्यात आलो तेव्हा मला या कारवाईविषयी सांगण्यात आलं. जेवढं मला माहीत होतं ते मी तुम्हाला सांगितलंय. मी दिल्लीत पोहोचल्यावर याविषयाचा सविस्तर अभ्यास करेन, जे बरोबर असेल ते करून योग्य तो न्याय करेन, अशी हमी केजरीवाल यांनी दिलीये.

हेही वाचाः घरे-जमिनींची मालकी देणार; पीडब्ल्यूडी कामगारांना न्याय

दिल्लीत जिल्हा प्रशासनाकडून चर्च जमीनदोस्त

दक्षिण दिल्ली जिल्हा प्रशासनाने सोमवार छतरपुरमध्ये एका अभियानांतर्गत अतिक्रमण केलेल्या जमिनीवर बांधलेली चर्च जमिनदोस्त केलीये. चर्चच्या सदस्यांनी ही कार्रवाई अवैध असल्याचं ठरवत परिसर खाली करण्यासाठी कोणतीच नोटीस दिली नसल्याचं सांगितलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | Himachal Pradesh | Flood | ढगफुटीनं हिमाचल प्रदेशातील जनजीवन विस्कळीत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!