बारावीच्या निकालाची गुणपद्धत कशी असावी?

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी: बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या निकालाची गुणपद्धत कशी असावी, यासाठी गोवा शालान्त मंडळाने राज्यातील नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊनच गुणपद्धत निश्चित करण्यात येणार आहे.
हेही वाचाः करोना काळात रजेबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा
या ई-मेलवर पाठवा सूचना
नागरिकांनी यासंदर्भातील सूचना ११ जूनपर्यंत [email protected] या ई-मेलवर पाठवाव्यात, असं मंडळाने म्हटलं आहे.
हेही वाचाः CORONA UPDATE | देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन मृत्यूंची नोंद
अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल जाहीर करणार
राज्यात करोनाचा प्रसार अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत बोर्ड परीक्षांचे आयोजन केल्यास विद्यार्थ्यांत करोनाचा प्रसार होऊ शकतो, हे लक्षात घेऊन काहीच दिवसांपूर्वी सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याचं गोवा शालान्त मंडळाने निश्चित केलं आहे. त्याच अनुषंगाने आता निकालाची गुणपद्धत कशी असावी, याबाबत नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.