राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडताय?

रिव्होल्यूशनरी गोवन्सच्या महिला नेता सुनयना गावडेंचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांना सवाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आम्ही पालक आमच्या मुलांच्या पालनपोषणापासून शिक्षण आणि सगळ्याच बाबतीत जबाबदार आहोत. पण तुम्ही एक गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काय जबाबदारी पार पाडत आहात? असा प्रश्न रिव्होल्यूशनरी गोवन्सच्या (आरजी) महिला नेत्या सुनयना गावडे यांनी केला.

हेही वाचाः ‘चक दे इंडिया’! भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उपांत्यफेरीत धडक

सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात महिलांकडून वातावरण तापत आहे. विधानसभा अधिवेशात बाणावलीच्या रेप केससंदर्भात बोलताना, पालकांनी अल्पवयीन मुलांना रात्री घराबाहेर पाठवू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानं राज्यातील महिला आणि पालक बरेच संतापलेत. या पार्श्वभूमीवर रिव्होल्यूशनरी गोवन्सच्या (आरजी) महिला गटाने पणजी येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.

हेही वाचाः अकारावीच्या विज्ञान किंवा डिप्लोमासाठीच्या सीईटीचा निकाल जाहीर

पोलिस यंत्रणा फक्त आरजीचा आवाज दाबण्यासाठी?

पोलिस यंत्रणेच्या गैरवापर फक्त मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आणि आरजीचा आवाज दाबण्यासाठी केला जातो असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला. गोवा राज्य महिला आणि मुलांसाठी आता सुरक्षित राहिलं नाही. वोट बँकचं राजकारण करण्यासाठी हे मंत्री परप्रांतियांना गोव्यात बेकायदेशीरित्या राहायला देतात. परिणामी हेच परप्रांतीय खूपशा गुन्ह्यांना कारणीभूत असतात. याचमुळे गोव्यात आम्हाला उघडपणे फिरायला देखील भीती वाटते, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचाः कर्फ्यूत पुन्हा वाढ, बार आणि रेस्टॉरंटला आणखी सूट

तर भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांनी राजीनामा द्यावा

भाजपच्या महिला मोर्चाने अशा रेप केसवर एकही विधान केलं नाही. त्यामुळे त्यांचं काम काय फक्त निवडणूक प्रचारासाठी गर्दी करणं एवढंच आहे का? गोवा राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी, महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारचे काहीच प्रयत्न दिसत नाहीत. अशा प्रसंगाबद्दल बोलता येत नसेल, तर भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांनी राजीनामा द्यावा, असं गावडे यांनी म्हटलं.

हेही वाचाः डेडलाईन चुकली! 31 जुलैपर्यंत गोव्यात पहिल्या डोसचं १००% लसीकरण झालंच नाही, मग झालं किती ?

महिलांचा वापर करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना गोव्याच्या महिला योग्य जागा दाखवतील

महिलांसाठी खास पब्लिक ट्रान्सपोर्ट, महिला स्पेशल पोलीस फोर्स, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही अशा सुविधा पुरवणं हे सरकारचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. फक्त निवडणूक प्रचारासाठी महिलांचा वापर करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना गोव्याच्या महिला योग्य जागा दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लवकरच आरजी आपल्या वुमन्स विंगची घोषणा करेल, असंही त्यांनी सांगितलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | ILLEGAL | लोकांच्या पैशातून खासगी हितासाठी बांधकाम?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!