मनोज परब यांना ताब्यात घेण्याचं कारण काय?

रिव्होल्यूशनरी गोवन्सचा सरकारला सवाल; मनोज परबांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आरजी कार्यकर्ते संतापले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः रिव्होल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) सुप्रिमो मनोज परब यांना डिचोली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ‘पोगो’ विधेयका संदर्भातील सह्यांचं निवेदन देण्यासाठी विधानसभा संकुलात जाणारे आरजीचे अध्यक्ष विरेश बोरकर आणि श्रीकृष्ण परब यांना पर्वरी पोलिसांनी ‌ताब्यात घेतलं आहे. या प्रकारावर ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच मनोज परबांना ताब्यात घेण्याचं कारण काय, असा सवाल सरकारला विचारलाय.

हेही वाचाः पावसामुळे चालकाला ‘ती’ गुरं दिसली नाहीत

मनोज परब, विरोश बोरकर तसंच श्रीकृष्ण परब यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरजीच्या सुनयना गावडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकारला याचा जाब विचारण्यात आला. मनोज परबांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचं कारण काय? काहीच कारण नसताना त्यांना ताब्यात का म्हणून घेतलंय? असे सवाल गावडे यांनी उपस्थित केलेत. तसंच सरकार कशाला एवढं घाबरलंय? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचाः आरजीचे सुप्रिमो मनोज परब यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सरकारने आरजीचं म्हणणं कधीच विचारात घेतलं नाही

आरजीने एखादी गोष्ट करायचं म्हटलं की पोलिसांच्या मदतीने सरकार नेहमीच आरजीच्या मार्गात खोडा उत्पन्न करत आलंय. हे सगळं कशासाठी? पोगो विधेयक पास करण्यासाठी आम्ही कितीतरी वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली, व्हिडिओजच्या माध्यमातून विनंती केली. मात्र आमचं म्हणणं कधीच विचारात घेतलं गेलं नाही. तसंच कुठल्याच अधिवेशनात या विधेयकावर चर्चा करण्यात आली नाही. असंख्य वेळा आवाहन करून, विनंती करून कुठल्याच आमदार किंवा मंत्र्यांने यावर चर्चा करणंदेखील महत्त्वाचं मानलं नाही, असं गावडेंनी सांगितलंय.

हेही वाचाः आज CBSE बारावीचा निकाल! इथे चेक करा किती मार्क मिळाले?

सामान्य गोंयकाराला आवाज आहे की नाही?

सरकार आरजीच्या विनंतीला, आवाहना दाद देत नाही म्हणून 6 महिन्यांपूर्वी आम्ही गोव्यातील प्रत्येक घराच्या दारावर जाऊन पोगो विधेयकाचं महत्व लोकांना पटवून दिलं आणि लोकांना ते पटलंही. सरकारपर्यंत गोंयकारांचं म्हणणं पोचवण्यासाठी गोंयकारांचे सही केलेले लेटर्स आज विधानसभेत देण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले होते. तिथे हे लेटर्स साधे इनवर्डही करून घेणं महत्त्वाचं मानलं नाही. आणि वरून विरेश बोरकर आणि श्रीकृष्ण परब यांना पर्वरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. याचा अर्थ काय समजावा? सामान्य गोंयकाराला आवाज आहे की नाही, असा सवाल गावडेंनी सरकारला विचारलाय.

हेही वाचाः …आणि खुल्या जागेतच अविश्वास ठराव मंजूर, शिरदोन पंचायतीत अनोखा प्रकार

गोंयकारांना आवाहन

गोंयकारांना आवाहन आहे, की तुम्हाला पोगो विधेयक पास झालेलं हवंय तर तुम्ही त्यासाठी आवाज उठवा, तुमच्या पाठिंब्याची आम्हालाही गरज आहे, असं गावडे म्हणाल्यात.

हा व्हिडिओ पहाः

काय आहे पोगो बिल?

आरजी ही संघटना मूळ गोंयकारांनी कायदेशीर व्याख्या अधिसूचित करा या मुद्द्यांवरून आंदोलन करत आहे. यासाठी त्यांनी प्रस्तावित विधेयकाचा मसुदा तयार करून तो सरकारला आणि सर्व आमदारांना पाठवला आहे. या विधेयकाचे ‘पोगो’ अर्थात ‘पर्सन ऑफ गोवन ओरीजीन’ असं नामकरण केलं आहे. या प्रस्तावात 19 डिसेंबर 1961 रोजी किंवा पूर्वी जन्मलेले किंवा त्यांच्या मुलांनाच मूळ गोंयकार समजावं आणि सर्व सरकारी योजना, सरकारी नोकऱ्यांसाठी ही व्याख्या लागू करावी, अशी मागणी केली आहे. सरकारने गृहनिर्माण मंडळाच्या नियमांत तशी तरतूद करून पोगोचे पालन केल्याचं दाखवून दिलं आहे. परंतु यात तीस वर्षांच्या रहिवासी दाखल्याची एक अट ठेऊन याला फाटा देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तावित पोगोचा सरकारने विचार केला ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्यातील 30 वर्षांच्या रहिवासी अटीचा पर्याय रद्द करावा, अशी मागणी आरजी कडून केली जातेय.

हा व्हिडिओ पहाः Video | Breaking | Bank | RBI | म्हापसा अर्बननंतर मडगाव अर्बन बँकेलाही फटका

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!