भारतीय निवडणूक आयोगाच्या बैठकीचा अर्थ काय? विधानसभेची निवडणूक लवकर होणार?

गोव्यासह प्रमुख राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांसोबत बैठक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भारतीय निवडणूक आयोगाने गोव्यासह मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकांसंबंधी आढावा बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ६ राज्यांच्या निवडणुका लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर २०२२मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या अनुशंगाने आढावा बैठक जरी घेण्यात आली असली, तरीही ही बैठक लवकर घेण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हेही वाचाः ‘लुई बर्जर’ लाचखोरी प्रकरणी कामत, चर्चिल विरोधात चालणार खटला

भारतीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या या बैठकीमुळे गोव्याची विधानसभा निवडणूक लवकर होण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. फेब्रुवारी/मार्च २०२२मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक होणं अपेक्षित आहेत. दरम्यान, त्याआधीही विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असाही अंदाज वर्तवला जातोय. आज भारतीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या बैठकीमुळे या अंदाजाला खतपाणी मिळालंय.

हेही वाचाः गोव्यातील समुद्र किनारी ‘ब्लू बॉटल जेलिफिश’चा धोका

फेब्रुवारी/मार्च २०२२मध्ये गोवा विधानसभेचा कार्यकाळ संपतोय. त्याआधीचं अखेरचं पावसाळी अधिवेशनही आजपासून सुरु झालेलंच आहेत. अशातच राजकीय वातावरण आधीच अधिवेशनामुळे तापलेलं असतानाच आता विधानसभा निवडणुकांबाबतची चर्चांना उधाण आलंय. राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. मात्र भारतीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या बैठकीमुळे गोव्यासह ज्या ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या सर्व राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय.

हेही वाचाः फेसबूकवर मैत्री, मैत्रीतून भेट, भेटीदरम्यान लैंगिक अत्याचार! दोघे संशयित गजाआड

कोण कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका?

येत्या काही महिन्यात गोव्यासह उत्तर प्रदेश, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि सरतेशेवटी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२२ हे वर्ष विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं राजकीय वर्ष ठरणार आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांची पूर्वपरीक्षाच असल्याप्रमाणे या विधानसभा निवडणुकांकडे पाहिलं जातंय. त्यात भाजपनं या निवडणुका डॉ. प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय. इतर मगो आणि आप तर दुसरीकडे काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील राजकीय समीकरणंही येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात गोव्यातील राजकीय वारे आणखी जोरात वाहणार, हे नक्की.

हा व्हिडिओ पहाः Video | CONGRESS-GF ALLIANCE| होय, गोवा फॉरवर्डसोबत युतीची चर्चा – गुंडू राव

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!