वेलडन इंडिया ! एका दिवसांत 78 लाखांहून अधिक विक्रमी लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं कौतुक!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोना लसीकरणाच्या जागतिक योगदिनी सुरू झालेल्या नव्या मोहिमेत आज पहिल्याच दिवशी तब्बल 78 लाखांहून अधिक नागरीकांनी लसीकरण केलंय. सरकारनं जाहिर केलेली ही आकडेवारी आशादायक असून ‘वेलडन इंडीया’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं कौतुक केलंय.

देशभरात कोरोना लसीकरण मोफत उपलब्ध करण्याच्या मोठया घोषणेनंतर आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. जागतिक योगदिनादिवशी नव्यानं लसीकरण मोहिमेला देशात सुरूवात झाली. आज पहिल्याच दिवशी तब्बत 78 लाखांहून अधिक नागरीकांनी लस घेतली. नव्या धोरणानुसार केंद्रसरकार स्वत: लस खरेदी करून ती राज्यांना देणार आहे. कोविन अॅपनुसार आज सायंकाळी सातपर्यंत 78, 75, 405 इतक्या नागरीकांनी लसीकरण केलंय.

या विक्रमी लसीकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिट केलंय. त्यात ते म्हणतात, “आजची लसीकरणाची विक्रमी आकडेवारी समाधान देणारी आहे. कोरोनासोबत लढण्यासाठी लस हेच आता आपल्याकडं मजबुत शस्त्र आहे. ज्यांनी लस घेतली त्यांचं कौतुक आणि ज्या कोविड योध्दयांनी इतक्या मोठया संख्येनं लसीकरण करण्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं त्यांचंही विेशेष कौतुक.”

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!