‘हॉस्पिटालिटी, रिटेल अँड इवेंट्स क्षेत्रात गोंयकार तरुणांसाठी करिअर संधी’वर वेबिनारचं आयोजन

4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वा. होणार वेबिनार; मुख्यमंत्री कार्यालय यु-ट्यूब चॅनल तसंच फेसबुक पेजवर वेबिनार लाईव्ह

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुख्यमंत्री कार्यालय आणि क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने हॉस्पिटालिटी, रिटेल अँड इवेंट्स क्षेत्रात गोंयकार तरुणांसाठी करिअरच्या संधी या विषयावर ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता लाईव्ह वेबिनारचं आयोजन केलं आहे. हे वेबिनार मुख्यमंत्री कार्यालय युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर लाईव्ह असेल. https://youtu.be/W9piPa8U9WA. Bit.ly/opportunitiesGoa या वेबसाईट/लिंकवरून वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकतात.

हेही वाचाः बाल शौर्य पुरस्कारासाठी २७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

करिअरसंबंधी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनार

गोव्यातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना करिअरसंबंधी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि करियर निवडण्यासाठी या वेबिनारचे आयोजन करण्यात आलं आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत युवकांना मार्गदर्शन करतील. त्यानंतर ताज गोवाचे विभागीय संचालक विन्सेंट रॅमोस हे हॉस्पिटालिटी, पर्यटन, हॉटेल्स आणि इतर क्षेत्रांतील संधीवर मार्गदर्शन करतील. तसंच मॅगसनचे सीईओ किरिट मगनलाल हे रिटेल उद्देगांतील करिअर संधी आणि क्रॉसक्राफ्टचे व्यवस्थापकीय संचालक सेर्राव सुकूर हे इवेंट्स क्षेत्रांतील करिअर संधीवर मार्गदर्शन करतील.

हेही वाचाः डी. पुरंदेश्वरी यांनी घेतलं महालक्ष्मी देवीचं दर्शन

इच्छुक विद्यार्थी, युवक, शिक्षकांनी वेबिनारचा लाभ घ्यावा

वरील क्षेत्रांत रोजगार मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थीं, युवक आणि पालक त्याचप्रमाणे शिक्षकांनी या वेबिनारचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | Goa Forward | ‘फ्रेन्डशिप डे’ला गोवा फॉरवर्डकडून प्रचाराला सुरुवात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!