गोवा, कोकणात वादळी वा-यासह पावसाची शक्यता

राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात गोवा आणि कोकणात 15 मे रोजी वीज, वादळी वा-यासह पावसाची शक्यता आहे तर 18 मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मच्छिमारांनी खोल समुद्रातुन बाहेर यावं, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसंच 1 जुन ते 31 जुलैअखेर राज्यात मच्छिमारी बंदीचे आदेशही देण्यात आले आहेत.

14 मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सागरी भागात काही ठिकाणी वीज आणि 40-50 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 15 मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
16 मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा), मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी 30-40 किमी प्रतितास वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर 50 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 17 मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 18 मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र (घाटमाथा) आणि कर्नाटक किनारपट्टीवरील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागातील किनारपट्टीवर 40-50 प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि गुजरात किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असणण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!