“हम इस खून से आसमाँ पर इन्किलाब लिख देंगे, क्रांती लिख देंगे”

चित्रपटसृष्टीचं 'कोहिनूर' दिलीपकुमार यांचा जीवनपट...

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ‘वो शादी के रास्ते चली गयी और मै बरबादी के वास्ते’ हे खोलपणे म्हणणारा आणि ‘मितवा’ अशी तलतच्या आवाजात आर्त हाक घालणारा , रफीच्या भावभीन्या आवाजात ‘सुख के सब साथी दुख में न कोय’ मधील एकेक भाव चेहर्‍यावर आणणारा, ‘आठ बजनेमें अब जादा देर नही है रायसाहब’ अशा साध्या वाक्यात जान ओतणारा, ‘ऐसे वीराने में इक दिन घुटके मर जायेंगे हम’ या शब्दांचे, संगीताचे आणि मुकेशच्या आवाजाचे सोने करणारा, ‘तुझे चांद के बहाने देखूं, तू छत पर आजा गोरिये’ मधली सगळी नटखट अदा एका क्षणात पेश करणारा, ‘चैन कैसा जो पहलू में तूही नही’ यातली विरहाची आग अत्यंत सहजपणे चेहर्‍यावर दाखवणारा, ”आयी है मेरे गम पे जवानी’ म्हणत परत हातात जाम घेताना एका व्यसनी माणसाचा कुणाला न कळालेला दर्द दाखवणारा ‘हम इस खून से आसमाँ पर इन्किलाब लिख देंगे, क्रांती लिख देंगे’ म्हणून मनामनांत शोले चेतवणारा, ‘मार डालो उसे, कर डालो उसका खून लेकिन मैं अपने फर्ज से गद्दारी नही करुंगा’ असे एकीकडे सुनावणारा तर दुसरीकडे ‘हाथ तो गर्म है डाक्टरसाब’ असे आर्तपणे म्हणणारा…..

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार या महान नायकाचं किती सार्थ शब्दांत यथार्थ वर्णन. ‘मिसळपाव’ या वेबसाईटवर सन्जोप राव यांनी हे लिहिलंय. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीचा एक मोठा आधार गेल्याचं दुख: आहे, पण त्यांच्या विविध भूमिकांच्या रुपानं ‘दिलीपसाब’ आपल्यासोबत राहतील. त्यांचा प्रवास मांडणारा हा खास व्हिडिओ आपल्यासाठी..

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!