आम्ही मीटर बसवणार नाही, मोबाईल अ‍ॅप चालेल

टॅक्सी व्यावसायिकांची आमदार सोपटेंसोबत चर्चा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पर्यटन टॅक्सी व्यावसायिक कोणत्याही परिस्थितीत मीटर बसवणार नाहीत. वेळप्रसंगी मोबाईल अ‍ॅप स्वीकारणार, परंतु अगोदर गोवा माईल्स रद्द करा आणि व्यवासायिकांना परमिट रद्द करण्याच्या आलेल्या नोटीसा मागे घ्या, अशी मागणी मांद्रे मतदारसंघातील पर्यटक टॅक्सी व्यावसायिकांनी आमदार दयानंद सोपटे यांच्याशी त्यांच्या मांद्रे येथील कार्यालयात भेट घेतल्यानंतर केली.

हेही वाचाः गोंयकारांनी कर्नाटक आणि केरळमध्ये रा. स्व. संघाचा पाया घातला

आमदार सोपटेंनी दहा जणांना कार्यालयात येऊन चर्चा करण्यास परवानगी दिली होती. मात्र टॅक्सी व्यावसायिकांनी त्यांची सूचना अमान्य केल्यानं आमदार सोपटेंना कार्यालयाबाहेर येऊन चर्चा करणं भाग पडलं.

आम्हाला गोवा माईल्स नको, आम्ही मीटर बसवणार नाही

आम्हाला गोवा माईल्स नको, आम्ही मीटर बसवणार नाही, त्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत, वेळ प्रसंगी मोबाईल अ‍ॅप स्वीकारू, असं सोपटेंना सांगितलं. शिवाय वाहतूक खात्याकडून परमिट रद्द करण्याच्या ज्या नोटीसा व्यासवायिकांना पोचल्या आहेत, त्या मागे घ्याव्यात. आमदार या नात्याने आमच्या समस्या आमच्या आमदाराने सोडवाव्यात, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी केली.

हेही वाचाः मोरजीत महिलांनी झाडाला बांधला राखीचा धागा

मी आमदार नव्हतो तेव्हा गोवा माईल्स अ‍ॅप आणलं गेलं

मी आमदार नव्हतो तेव्हा गोवा माईल्स अ‍ॅप आणलं गेलं. मीटर बसवण्याचा आदेश हा न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे या विषयात मी हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र इतर विषय मी पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन, असं आमदार सोपटे म्हणाले.

हेही वाचाः कोलवाळध्ये 1.310 किलो गांजा जप्त

मग सर्वच आमदार गप्प का ?

पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभेत छातीठोकपणे आपण मोबाईल अ‍ॅप आणल्याचं सांगितलं. तेव्हा चाळीस आमदारातील एकही आमदार काही का बोलला नाही, असा प्रश्न टॅक्सी व्यावसायिकांनी उपस्थित केला. आमचा व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारने भुमिपुत्रांना मदत करावी. बिगर गोमंतकियांना मदत करण्यापेक्षा स्थानिकांना सहकार्य करावं, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी केली.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | CABO DE RAMA FORT | काब द राम किल्ल्यावर कुणाचा कब्जा ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!