लसीकरणासंदर्भांत येणाऱ्या अफवा आपल्याला थांबवायच्या आहेत…

'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी रेडिओवरुन मन की बात कार्यक्रमाव्दारे संवाद साधला. मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील 25 वा तर एकूण 78 भाग आहे. मन की बात दरम्यान, मोदी यांनी मध्यप्रदेशातील बैतूल गावातील लोकांशी संवाद साधला. दरम्यान, गावातील लोकांनी आमच्याकडे लसीकरणासंदर्भांत अफवा पसरवण्यात येत असून यामुळे मृत्यू होत असल्याचे मोदी यांना सांगितले.

प्रत्युत्तरात मोदी म्हणाले की, लसीकरणासंदर्भांत ज्या अफवा पसरण्यात येत आहे त्याला आपल्याला थांबवायच्या आहेत. मी आणि माझी आई दोघांनी मिळून लसींचे दोन्ही डोस घेतले आहे. लसींमुळे मृत्यू होतो यामध्ये थोडेही सत्य नाही. त्यामुळे तुम्हीही लस घ्या आणि इतरांना प्रेरित करा.

देशातील जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आता ऑलिम्पिकची चर्चा होत आहे, तेंव्हा महान घावपटू मिल्खा सिंग यांना कसे विसरता येईल. काही दिवसांपूर्वी कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतले. ते पुढे म्हणाले की, जेव्हा मिल्खा सिंग रुग्णालयात होते तेंव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. मी बोलताना त्यांना म्हटले की तुम्हाला टोकियो ऑलिम्पिकचे प्रतिनिधित्व करायचे आहे. त्यासोबतच आपल्या देशातून ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढवत त्याना आपल्या संदेशातून प्रेरणा देण्यास सांगितले होते.

भाजपा मुख्य कार्यालयात ‘मन की बात’ पाहताना पक्षाचे गोवा प्रमुख सदानंदशेठ तानावडे, सतीश धोंड, प्रेमानंद म्हांबरे, गोविंद पर्वतकर आदी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!