कोविड-19 चाचण्या घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा

आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंचे सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील चाचणीची टक्केवारी अबाधित ठेवण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना कोविड-19 चाचण्या घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिलेत. गेल्या एका आठवड्यात 19-20 टक्के पॉझिटिव्हिटी रेटसह राज्यात सध्या दररोज 3000 ते 4000 कोविड नमुन्यांची चाचणी होतेय.

हेही वाचाः देशभरात रुग्णवाढीला ब्रेक! पण मृत्यू कमी कधी होणार?

जास्तीत जास्त कोविड चाचण्या करा

बुधवारी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात आरोग्यमंत्री म्हणालेत की, मी राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत आभासी बैठक घेतली होती. मी त्यांना सूचना दिल्या आहेत की त्यांनी सामाजिक आरोग्य केंद्रे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जास्तीत जास्त चाचण्या कराव्यात, जेणेकरून चाचणीची टक्केवारी अबाधित राहील.

लसीकरणाबाबत जागरुकता सुनिश्चित करा

बैठकीदरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांना कोविड-19 विरुद्धच्या या लढ्यात सरकारने उचललेल्या पावलांची माहिती देण्यात आली. तसंच लसीकरणाबाबत जागरूकता सुनिश्चित करण्यासाठी तळागाळात पोहोचण्यास आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितलं असल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः दांडेलीत 75 लाखाच्या बनावट तर 4.5 लाखाच्या खऱ्या नोटा जप्त

ऑक्सिजन, बेड्सची व्यवस्था

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये ऑक्सिजनसह बेड्स आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जीएमसीतील रुग्णालयाव्यतिरिक्त, अत्याधुनिक सुविधांसह कोविड प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी बालरोगशास्त्रासाठी समर्पित रुग्णालय बांधण्याच्या राज्य सरकारच्या योजनेची माहिती दिली असल्याचं आरोग्यमंत्री म्हणालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!