कळंगुट किनार्‍यावर अवतरले तुफान

सोमवारी संध्याकाळची घटना; जॉन लोबोंनी मोबाईलमध्ये कैद केलं तुफान

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः कळंगुट समुद्रकिनारी कमकुवत तुफानाने सोमवारी संध्यकाळी धडक दिली. चक्रीवादळामुळे भयभित झालेल्या लोकांमध्ये काही वेळ या तुफानाच्या नजर्‍यामुळे धडकी भरली. शेवटी तुफान नाहीसे झाल्याने लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.

हेही वाचाः पाच गुन्हे, १३ गजाआड; २.३१ किलोचा ड्रग्ज जप्त

जॉन लोबोंनी मोबाईलमध्ये कैद केलं तुफान

सोमवारी संध्यकाळी सव्वा सहाच्या सुमारास समुद्राच्या खोल पाण्यात कमकुवत तुफान आलं. हवामानातील एका विचित्र बदलाचा हा नजराना कळंगुटवासियांना पाहिला. शॅक मालक कल्याण सोसायटी संघटनेचे सरचिटणीस जॉन लोबो यांनी हे तुफान आपल्या मोबाईलवर चित्रीत केलं. आकाशात उभ्या पांढर्‍या स्तंभांसह तुफानासारखे वारे समुद्रातून हळूहळू किनारी सरकत गेलं. काही वेळानंतर हे तुफान नाहीसं झालं.

सुदैवाने नुकसान आणि जीवितहानी नाही

त्यापूर्वी कळंगुट समुद्रकिनारी हे तुफान आम्ही थांबलो होतो, तिथे यायला लागलं. त्यामुळे आम्ही तेथून पळ काढला. तुफान आमच्यापासून थोडंसं दूर गेलं आणि नाहीसं झालं. यामुळे कुणाचंही नुकसान झालं नाही किंवा कुणालाच कसलीच दुखापत झाली नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!