‘मिशन फॉर लोकल’तर्फे पेडण्यात पाणी पुरवठा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी
पेडणे: कोरगावातील ‘मिशन फॉर लोकल’ संस्थेचे सामाजिक कार्यकर्त्ये राजन बाबुसो कोरगावकर यांनी कोरोना महामारीच्या काळात तहानलेल्या जनतेला पाणी पुरवठा करण्याची योजना आखली. आतापर्यंत त्यांनी 800 हून अधिक टॅंकरद्वारे पेडण्यात पाणी पुरवठा केला आहे.
हेही वाचाः TIKA UTSAV | म्हापशात तीन दिवसीय टीका उत्सव
मागणी तसा पुरवठा
11 एप्रिल 2021 पासून ‘मिशन फॉर लोकल पेडणे’तर्फे संपूर्ण पेडणेवासीयांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय संस्थेने करून दिली आहे. इथे कुठलाच प्रकारचा मतभेद नाही. मागणी तसा पुरवठा या तत्वावर हे धोरण राबवण्यात येत आहे, असं संस्थेचे राजन कोरगावकर म्हणाले.

दिवसाला 15 ते 18 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा
आत्तापर्यंत जवळपास संपूर्ण कोरगाव पंचायत क्षेत्रात अनेक लोकांना पाण्याची सोय संस्थेने करून दिली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 7.30 पर्यंत ‘मिशन फॉर लोकल’चा पाण्याचा टँकर सगळीकडे फिरून गावा-गावात पाणी पुरवतोय. दिवसाला जवळपास 15 ते 18 टँकरद्वारे लोकांना पाणी पुरवण्याचं काम संस्थेतर्फे होतंय, असं कोरगावकरांनी सांगितलं.
हेही वाचाः प्रजासत्ताक कोरियाने भारताला पाठवली वैद्यकीय मदत
चक्रीवादळानंतर 35 ते 40 टँकरद्वारे लोकांना पुरवलं पाणी
हल्लीच राज्यात चक्रीवादळ झाल्यानंतर पेडणे तालुक्यात पाण्याची कमतरता खूपच भासू लागली. यावेळी ‘मिशन फॉर लोकल’तर्फे पेडणे भागात एका नवीन टॅंकरद्वारे लोकांना पाणी देण्यात आलं. या काळात संस्थेने सकाळी 7.30 ते रात्री उशिरा 10.30 पर्यंत पाण्याचा टँकर सगळीकडे फिरून पाणी पुरवठा केला. असं करून संपूर्ण दिवसाला जवळपास 35 ते 40 टँकरद्वारे लोकांना पाणी पुरवण्याचं काम संस्थेने केलं. अलीकडेच निगळे, पेडणे येथील ओहळावरील पूल कोसळल्यानं लोकांना पाणी मिळेनासं झालं. यावेळी वारखंडद्वारे जाऊन टॅंकरने या गावातील लोकांना पाणी पुरवण्याचं काम संस्थेतर्फे करण्यात आलं.

आतापर्यंत 800 हून अधिक टँकरद्वारे पुरवलं पाणी
सध्या पाण्याची समस्या राज्याला भेडसावत आहे. आतापर्यंत ‘मिशन फॉर लोकल’ने 800 हून अधिक टँकरद्वारे पेडणे भागात पुरवलं आहे. ही समस्या शासनाने, लोकप्रतिनिधींनी सोडवायला हवी होती, मात्र त्यात प्रशासन अपयशी ठरलंय. सरकारला लेखी निवेदनं देऊन, अधिकाऱ्यांना घेराव घालून जनता कंटाळली आहे. पाणी म्हणजे जीवन. ते 24 तास जनतेला मिळायला हवं. मात्र आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी पाण्याची समस्या सोडवली नाही. आता यापुढे भुमिपुत्रांना संघटीत होऊन ही समस्या सोडवायला हवी, असं कोरगावकर म्हणाले.
हेही वाचाः मोरजीतील कुडाळकर, कार्दोज कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करणार
पेडण्यात घरोघरी जल योजना नेणार
सामाजिक बांधिलकी ओळखून आम्ही मतदार संघात सर्वांपर्यंत पोचणार आहोत. सर्वांच्या सहकार्यानेच ही जल योजना धारगळ, मोपा, पत्रादेवी, पेडणे आणि कोरगाव भागात घरोघरी पोहोचवणार आहोत. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांनी ‘मिशन फॉर लोकल’ कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कार्यकर्ते राजू तसंच इतरांशी संपर्क करावा, असं आवाहन कोरगावकरांनी केलं.