जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने वणवण

आसगावात नागरिकांचे पाण्याअभावी हाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: जलवाहिन्या नादुरुस्त झाल्याने महिनाभरापासून आसगावतल्या नागरिकांचे पाण्यासाठी हाल होतायेत.सोनारखेड भागात चाललेलं जलस्त्रोत खात्याचे काम नागरिकांनी बंद पाडलय.या भागात जलस्त्रोत खात्याने पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी वाहिनी टाकण्याचं काम सुरू केलेलं.पण या दरम्यान गावात पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होतायेत. मध्यांतरी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जात होते.मात्र आता सहा दिवसांपासून तेही बंद झाल्याने त्रास सहन करावे लागतायेत, अस गावातल्या बायकांनी म्हटलंय.दिवसातून किमान चार तास तरी पाणीपुरवठा करा अशी मागणी तिथले नागरिक करताना दिसतायेत. सांबाखा अधिकाऱ्यांच्या माहिती नुसार, हणजुण येथे नवीन जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी वाहिनीचे काम सुरू आहे.त्यामुळे याच वाहिनीच्या खाली असलेल्या सध्याच्या जलवाहिनीचे नुकसान झालय असही त्यांनी सांगितलय.

– हेही वाचा

  • पत्ता विचारायला आले आणि सोन्याची चैन पळवून गेले

https://www.goanvartalive.com/goa/mhapsa-chain-snatching-theft-marathi-crime/

  • पर्वरी ATM चोरी प्रकरण : तिघांना दिल्लीतून पकडलं, मुख्य आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला

https://www.goanvartalive.com/goa/atm-theft-in-porvorim-caught-in-delhi-marathi/

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!