राज्यातील ‘या’ भागांत पाणी टंचाई जाणवणार….

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : राज्यात साळावली, आमठाणे, अंजुणे, पंचवाडी, चापोली, गवाणे तसेच महाराष्ट्रातील तिळारी या धरणांचे पाणी वापरले जाते. आकाराने लहान असलेल्या राज्यात इतकी धरणे असूनही पाणी टंचाई भासते. राज्यात एप्रिल महिन्यातच अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गेली अनेक वर्षे हीच स्थिती आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाण्यासाठी वणवण करावी लागते. पावसाचे पाणी याेग्य प्रकारे साठवून ठेवले जात नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
हेही वाचाःअखेर मृतदेह सापडला, आत्महत्येमागचे कारण काय?
धरणांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष
कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या धरणांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले जाते. सर्वच धरणांत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणे लवकर भरतात आणि फेब्रुवारी, मार्च महिन्यात पाण्याची पातळी खूप कमी होते. धरणांतील गाळ काढला तर पाणी साठवण्याची धरणांची क्षमता वाढणार आहे. पण याकडे सरकारने लक्ष दिलेले दिसत नाही.
हेही वाचाःश्रीलंकेत आंदोलकांवर गोळीबार…
अनेक वर्षे धरणांच्या साफसफाईचे काम झालेले नाही. हे काम हाती घेतले जाणार आहे. पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी नवीन उपक्रम घेतले जाणार आहेत. धरणांमधील गाळ काढण्यासाठी लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
सुभाष शिराेडकर, जलस्रोतमंत्री
धरणांमधील जलसाठा
धरण | क्षमता (एचएम) | सध्याचा जलसाठा |
साळवली | २३,४३६ | ११,५९७ .७० |
अंजुणे | ४,४८३ | १,४६१.८१ |
आमठाणे | ५९५ | ३९०.१० |
पंचवाडी | ४४७ | १४१.३४ |
चापाेली | १,१२२ | ६७६.४९ |
गवाणे | १७७ | ९६.७८ |
तिळारी | ४६,२१७ | २९,८२४.५० |