WATER CUT | बार्देशवासीयांच्या तोंडचं पाणी पळणार…

१५, १६ एप्रिलला बार्देशात पाणीपुरवठा बंद, तर १७ एप्रिलला मर्यादित पाणी पुरवठा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बार्देश तालुक्याला दोन दिवस पाणीकपतीला सामोरं जावं लागणारेय. गुरुवार, शुक्रवारी बार्देश तालुक्याचा पाणीपुरवठा बंद असणारेय.

करासवाडा जंक्शन ते कोलवाळपर्यंत जलवाहिनी स्थलांतरणाचं काम

करासवाडा जंक्शन ते कोलवाळपर्यंत येथील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील जलवाहिनी स्थलांतरित करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यामुळे १५ आणि १६ एप्रिलला अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प हा तब्बल ३६ तास बंद ठेवला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय.

१७ एप्रिलला होणार मर्यादित पाणीपुरवठा

प्रकल्प बंद राहणार असल्यान १५ एप्रिलला सकाळी ७ वाजल्यापासून ते १६ एप्रिल रात्री ७ वाजेपर्यंत असे दोन दिवस संपूर्ण बार्देश तालुक्याचा पाणीपुरवठा बंद राहील. तसंच १७ एप्रिलला संपूर्ण तालुक्याला मर्यादित पाणीपुरवठा केला जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!