पालिका निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर! कुणासाठी कोणता वॉर्ड आरक्षित, वाचा सविस्तर

पालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : जिल्हा पंचायत निवडणुकांनंतर राज्यातील पालिका निवडणुका केव्हा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच पालिका निवडणुकांच्या आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. निवडणुका होण्याच्या तीन आठवडे आधी वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करावं असे निर्देश देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर अखेर आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मे महिन्यात पालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यन, निवडणूक आयोगानं पालिका निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्याची माहिती दिली होती. महत्त्वाच म्हणजे आज आरक्षण जाही केल्यामुळे मे महिन्यात पालिका निवडणुका होणार का, याकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे, नेमक्या कोणत्या वॉर्डसाठी कुणाला कसं आरक्षण देण्यात आलं आहे, त्यावर एक नजर टाकुयात.

राज्यात एकूण ११ नगरपालिका आहेत. त्यातील कोणत्या नगरपालिकेसाठी आरक्षणाची विभागणी कशी करण्यात आली आहे, ते प्रत्येक नगरपालिकेप्रमाणे समजून घेऊयात.

१ मडगांव पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 7, 11, 16, 19, 20, 23, 24 आणि 25 आरक्षित करण्यात आला आहे. अनुसूचित जमातींसाठी वार्ड क्रमांक 4 आणि 7 आरक्षित करण्यात आला आहे. ओबीसींसाठी वार्ड क्र. 2, 6, 16, 18, 19 आणि 21 आरक्षित करण्यात आला आहे.

२ मुरगांव पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 10, 11, 13, 15, 17, 21, 23 आणि 25 आरक्षित करण्यात आला आहे.
तर अनुसुचित जातींसाठी वार्ड क्रमांक 1 आरक्षित करण्यात आला आहे. ओबीसींसाठी वार्ड क्रमांक 6, 9, 11, 16, 21 आणि 23 आरक्षित करण्यात आला आहे.

३ म्हापसा पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 2, 4, 6, 10, 13 आणि 18 आरक्षित करण्यात आला आहे. तर अनुसूचित जातींसाठी वार्ड क्र. 11 आरक्षित असणार आहे. ओबीसींसाठी वार्ड क्र. 1, 3, 6, 13 आणि 16 आरक्षित करण्यात आलाय.

४ कुडचडे-काकोडा पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 8, 9, 10, 12 आणि 15 आरक्षित करण्यात आला आहे.
अनुसूचित जमातींसाठी वार्ड क्रमांक 11 आरक्षित करण्यात आला आहे. ओबीसींसाठी वार्ड क्र.3, 6, 8 आणि 15 आरक्षित करण्यात आला आहे.

५ केपे पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 3, 6, 9 आणि 11 आरक्षित करण्यात आला आहे.
अनुसूचित जमातींसाठी वार्ड क्रमांक 9,12 आरक्षित करण्यात आला आहे.
ओबीसींसाठी वार्ड क्र.1, 6 आणि 7 आरक्षित करण्यात आला आहे.

६ कुंकळ्ळी पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 1, 3, 4 आणि 7 आरक्षित करण्यात आला आहे.
अनुसूचित जमातींसाठी वार्ड क्रमांक 4 आरक्षित करण्यात आला आहे.
ओबीसींसाठी वार्ड क्र. 1, 6, 8 आरक्षित करण्यात आला आहे.

७ काणकोण पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 3, 5, 9 आणि 11 आरक्षित करण्यात आला आहे.
ओबीसींसाठी वार्ड क्र. 5, 6 आणि 12 आरक्षित करण्यात आला आहे.

८ डिचोली पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 2, 4, 6 आणि 8 आरक्षित करण्यात आला आहे.
ओबीसींसाठी वार्ड क्र. 3, 6 आणि 10 आरक्षित करण्यात आला आहे.

९ सांगे पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 3 ,8 आणि 9 आरक्षित करण्यात आला आहे.
अनुसूचित जमातींसाठी वार्ड क्रमांक 1 आरक्षित करण्यात आला आहे.
ओबीसींसाठी वार्ड क्र. 6 आणि 9 आरक्षित करण्यात आला आहे.

१० वाळपई पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 4, 8 आणि 10 आरक्षित करण्यात आला आहे.
ओबीसींसाठी वार्ड क्र. 3 आणि 8 आरक्षित करण्यात आला आहे.

११ पेडणे पालिका आरक्षण

महिलांसाठी वार्ड क्रमांक 3, 5 आणि 6 आरक्षित करण्यात आला आहे.
तर अनुसुचित जातींसाठी वार्ड क्रमांक 9 आरक्षित करण्यात आला आहे.
ओबीसींसाठी वार्ड क्र. 1, 4 आणि 5 आरक्षित करण्यात आला आहे.

हेही वाचा – दहा हजार सरकारी नोकऱ्यांवर 2022 च्या सत्तेचा डाव?

प्रेरणादायी! शिवणकामातून नाव कमावणाऱ्या मांद्रेतील संजय सातोस्करांची यशोगाथा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!