वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.51 टक्के

विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः सारस्वत विद्यालय सोसायटीच्या पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा एकूण निकाल 98.51% लागला असून विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन करत विद्यालयाची यशाची परंपरा अखंड सुरू ठेवली आहे.

हेही वाचाः ACCIDENT | धारगळ जंक्शनवर ट्रक – दुचाकीचा अपघात

विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के

विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल 99.34% लागला. कला शाखेचा 99.29% , तर विद्यालयातील व्यावसायिक शाखेचा एकूण निकाल 94.07% इतका लागला आहे.

हेही वाचाः Tokyo Olympic 2021 : ‘चक दे इंडिया’; 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक

शर्वाणी कांबळी हिने 98.67% गुण मिळवत विद्यालयात प्रथम

शर्वाणी कांबळी हिने 98.67% गुण मिळवत विद्यालयात तसंच विज्ञान शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. इतकंच नव्हे तर तिने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि हिंदी या विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवत उत्तुंग यश संपादन करत एक नवा इतिहास रचला. यश शेटकर 92.83% गुण घेऊन विज्ञान शाखेत द्वितीय आला, तसंच त्याने भौतिकशास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले. ओंकार म्हामल याने 83.83% गुण मिळवत तृतीय येण्याचा मान पटकावला.

हेही वाचाः मोदी सरकारचा मोठा निर्णय; सर्व शिक्षा अभियान 2.0 ला मंजुरी

विद्यालयाच्या कला शाखेतून तन्वी पाटील ही विद्यार्थीनी 94.5% इतके गुण मिळवून प्रथम, ऋतुजा पोखरे 92.66% गुण मिळवत द्वितीय आणि पवनी चौधरी 92.5% गुण मिळवत तृतीय आली.

हेही वाचाः इंटरनेट सेवेचा शिक्षणासाठी वापर करा

वाणिज्य शाखेतून चेतना मांद्रेकर प्रथम आली असून तिला 86.83% गुण मिळालेत, तर प्रतिक गणपुले याला 84.33% गुण मिळाले असून तो द्वितीय, तर यश भोसले याला 83.33% गुण मिळाले असून तो तृतीय आला आहे.

हेही वाचाः Tokyo Olympics 2021 : फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं!

विद्यालयातील व्यवसायिक शाखेतील कम्प्युटर टेक्निकचा निकाल 100% टक्के लागला असून अनिल लमाणी याने 89% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर आदर्श चोडणकर आणि रिषभ सिमेपुरुषकर यांनी 88% मिळवत द्वितीय, तर दशरथ नाईक याने 81.75 % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवलाय.

हेही वाचाः आमदार सोपटेंनी नव्हे, विजय सरदेसाईंनी गोवा विकायला काढला होता

ऑटो इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा निकाल 80% लागला असून लक्षित हरमलकर याने 77.87% गुण मिळवत प्रथम आला, तर सर्वेश च्यारी याला 77.75% गुण मिळाले असून तो द्वितीय, तर मोहम्मद इमरान अंसारी याला 74.5% गुण मिळाले असून तो तृतीय आला आहे.

हेही वाचाः BREAKING | राज्यातील प्रवासी टॅक्सी दरांत वाढ

अकाउंटन्सी अँड ऑडिटिंगचा निकाल 96.29% लागला आहे. दीपिका नायर हिला 85% गुण मिळाले असून ती प्रथम आली, तर महबूबी मुजावर 83.6% गुण मिळवत द्वितीय, तर निकिता सासोलकर हिला 80.1% गुण मिळाले असून ती तृतीय आली.

हेही वाचाः कणकवलीनजीक 4,57,000 ची गोवा दारू पकडली ; एकास अटक

ऑफिस मॅनेजमेंटचा निकाल 100% टक्के लागला. डायलन रॉड्रिगीजला 81.37% गुण मिळाले असून तो प्रथम, लक्ष्मी कल्लीमणी 78.5% गुण मिळवत द्वितीय, तर रक्षा तुळसकर 71.25% गुण मिळवत तृतीय आली.

हेही वाचाः केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वाहनांसाठी रजिस्ट्रेशन आणि RC शुल्क माफ

यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक

विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल तसंच विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली याबद्दल सारस्वत शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष रामनाथ बुर्ये, सचिव रूपेश कामत तसंच खजिनदार अश्‍विनीकुमार प्रभू यांनी विद्यालयाच्या प्राचार्य सुप्रिया नेत्रावळकर यांचं तसंच यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाचे अभिनंदन केलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | MIGRANT | परप्रांतीयांसाठी हे विधेयक आणल्याचा दावा फोल!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!