पेडण्यातील तीन पंचायतींसाठी मतदान सुरू…

१७ प्रभागांमधून ४० उमेदवार रिंगणात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणे : पेडणे तालुक्यातील चांदेल हसापूर, हळर्ण-तळर्ण आणि कासारवर्णे या तीन पंचायतींच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. आज ९ डिसेंबर रोजी मतदान होत असून रविवार ११ रोजी सकाळी १० पर्यंत निकाल लागणार आहे. एकूण १७ मतदान केंद्रांवर मतदान होत असून १७ प्रभागांमधून ४० उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी संत सोहिरोबनाथ आंबिये महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
हेही वाचाःमडगाव फेस्तनिमित्त नगराध्यक्षांनी घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय…

शांततेत मतदान करा

मतदरांनी शांततेत मतदान करा आणि लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा. कुठेच अनुचित प्रकार घडू नये, एखाद्या वेळी मतदान केंद्रावर काही गोंधळ उडाला असेल तर तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडे पोलिसांकडे त्वरित संपर्क साधून मतदान सुरळीत होण्यासाठी मदत करा, असे आवाहन माहिती निवडणूक अधिकारी तथा मामलेदार अनंत मळीक यांनी केले आहे.
हेही वाचाःगोव्यातून महाराष्ट्राच्या दिशेने दारू वाहतूक करणारा कंटेनर पलटी…

चांदेल हसापूर, हळर्ण-तळर्ण आणि कासारवर्णे

दरम्यान, हळर्णमधून १४ उमेदवार, कासारवर्णे पंचायत क्षेत्रामधून १५ उमेदवार आणि चांदेल पंचायत क्षेत्रामधून ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. हळर्ण पंचायत क्षेत्रात एकूण पाच प्रभाग असून त्यामधून एकूण १,५३८ मतदारांपैकी ७५२ महिला, तर ७८६ पुरुष मतदार, कासारवर्णे पंचायत क्षेत्रात एकूण चार प्रभागांमधून एकूण १,०८६ मतदारांपैकी ५४८ पुरुष, ५३८ महिला, तर चांदेल हसापूर पंचायत क्षेत्रातील एकूण पाच प्रभागांमधून १,७६४ मतदार आहेत आणि त्यामध्ये ८६३ महिला, ९०१ पुरुष मतदारांचा समावेश आहे.
हेही वाचाःराज्यातील प्रत्येक इस्पितळात आयुष विभाग स्थापन करणार!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!