मतदारांच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य

भाजप नेते आणि माजी आमदार सुभाष फळदेसाईंची प्रतिपादन; सांगेत कमळ फुललं

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

सांगेः नगरपालिका निवडणुकीत सांगेत कमळ फुललं. भाजप पक्षाने नगरपालिका निवडणुकीत बाजी मारली आहे. ७ जागांवर निवडून येत भाजपने सांगेत आपल्या सत्तेवर शिक्कामोर्तब केलं आहे. सांगे नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या विजयावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि माजी आमदार सुभाष फाळदेसाई म्हणाले की, समाजातील सर्व स्तरातील मतदारांनी पक्षाला पाठिंबा दिला त्यामुळे आमचा विजय शक्य झाला.

मतदारांच्या पाठिंब्यामुळे आजचा दिवस

सांगे पालिका निवडणुकीत भाजपला एकूण १० जागांपैकी फक्त ७ जागा मिळवता आल्यात. अंतर्गत मतभेदांमुळे पक्षाला दोन जागा गमवाव्या लागल्या. पण सांगे पालिकेच्या कार्यक्षेत्रात अल्पसंख्याक समुदायातील मतदारांचं वर्चस्व आहे, ज्यांनी भाजपवर आपला विश्वास दाखवलाय, ज्यामुळे १० पैकी ७ जाणांवर भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकले. भाजपने सर्व समाजातील इच्छुक उमेदवारांना या पालिका निवडणुकीत पुढे येण्याची संधी दिली. त्यामुळे आज हे शक्य झालंय, असं फळदेसाई म्हणाले.

राग झटकून पक्षाच्या यशासाठी एकत्र या

काही पक्ष कार्यकर्त्यांना या निवडणुकीत तिकीट मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज झालेत. पण त्या सर्वांनी आपला राग दूर करावा. आणि मतदारसंघातील पक्षाच्या यशासाठी पुन्हा एकत्र यावं, असं आवाहन माजी आमदार फळदेसाईंनी पक्ष कार्यकर्त्यांना केलं आहे.

सांगे नगरपालिकेचा निकाल; भाजपची बाजी, 7 जागांसह भाजपची सत्ता

वॉर्ड नं.१ रुमाल्डो फर्नांडीस (प्रसाद गांवकर)
वॉर्ड नं.२ मॅसीहा डी कॉस्टा (सावित्री कवळेकर समर्थक)
वॉर्ड नं.३ सांतीक्षा गडकर (भाजप)
वॉर्ड नं. ४ सय्यद इक्बाल (भाजप)
वॉर्ड नं.५ प्रीती नाईक (भाजप)
वॉर्ड नं. ६ फौजिया शेख (प्रसाद)
वॉर्ड. नं. ७ क्विरोझ क्रूझ (भाजप)
वॉर्ड नं. ८ संगमेश्वर नाईक (अपक्ष) (माजी आमदार वासू नाईकांचे सुपुत्र)
वॉर्ड. नं. ९ श्वेता तारी (भाजप)
वॉर्ड नं. १० अर्चना गावंकर (भाजप)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!