ब्रह्मेशानंदाचार्यांची अयोध्या श्रीराम जन्मभूमीला भेट

आचार्य सभेच्या प्रमुख सदस्यांची उपस्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुंडई: बहुप्रतिक्षित अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरु आहे. प्रभू श्रीराम हे समस्त भारतीयांचेच काय, तर विश्वाचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे श्रीराम जन्मभूमी, श्रीराम मंदिर हे संपूर्ण देशवासीयांचं तसंच विश्ववासीयांचं श्रद्धेचं स्थान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा अयोध्येचा विषय प्रलंबित होता. यासाठी देशातील अनेक संतविभूती, धर्मपीठे, संस्था तसेच प्रत्येक श्रीराम भक्त सम्मिलित होऊन आपली श्रद्धा समर्पित करीत होते. श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर तथा आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक धर्मगुरु धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी द हिंदू धर्म आचार्य सभा, अखिल भारतीय संत सभा, दिव्य देवस्थान सभा अशा विविध भव्यदिव्य कार्यक्रमातून श्रीराम मंदिर निमाणार्थ विशेष नेतृत्व केलं आहे.

हेही वाचाः हिमालयाची उंची, समुद्राची खोली यांचा समन्वय राखून कार्य करणार

हिंदू आचार्य सभेची योगी आदित्यनाथांशी चर्चा

दि. १९ रोजी द हिंदू धर्म आचार्य सभेच्या प्रमुख सदस्यांनी उत्तरप्रदेश मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथे शासकीय निवासस्थानी भेट घेऊन श्रीराम मंदिर निर्मिती व हिंदू धर्म व संस्कृतीवर विचारशील चर्चा केली. सर्व आचार्यांनी महंत योगी आदित्यनाथ त्यांच्या धाडसी आणि दूरदर्शी उपक्रमांसाठी अभिनंदन करुन सन्मानित केलं. द हिंदू धर्म आचार्य सभेतील सर्व आचार्यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या यशस्वी कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं. 

उत्तर प्रदेश सरकार द्वारे पूज्य स्वामीजींचा गौरव

दरम्यान, महंत योगी आदित्यनाथजींनी गोव्यात सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींद्वारे सुरु असलेल्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत उत्तर प्रदेश सरकार द्वारे पूज्य स्वामीजींना गौरवान्वित करण्यात आलं. तद्नंतर द हिंदू धर्म आचार्य सभेतील सर्व संत-महंतांनी अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण स्थानी श्रीरामलल्लांचे दर्शन करुन मंदिर निर्मितीच्या कार्याची पाहणी केली.

या भेटी प्रसंगी द हिंदू धर्म आचार्य सभेचे संयोजक स्वामी परमात्मानंद सरस्वती-राजकोट, सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी-गोवा, महामंडलेश्वर विश्वेश्वरानंद स्वामीजी-मुंबई, स्वामी ज्ञानानंदजी-वृंदावन, शास्त्री माधवप्रियदासजी-गुजरात, स्वामी कृष्णमणिजी-गुजरात, श्री शंभूनाथजी, श्री योगराजजी आदि संत-महंत उपस्थित होते.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | SUICIDE OR MURDER? | हाताच्या नसा कापलेल्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!