सोशल डिस्टन्सिंगला अग्निशमन दलाच्या जवानांकडूनच हरताळ! फोटो VIRAL

…अशाने कोरोना रुग्ण आणखी वाढणार!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय. दररोज दोनशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. अशात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होते आहे. मात्र अशातच अग्निशमन दलाच्या जवानांकडूनच सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नसल्याचे फोटो समोर आले आहेत. अग्निशमन दलाच्या केंद्रातून आलेले जवान मोठ्या संख्येनं एकत्र जमल्याचं पाहायला मिळालंय.

खुद्द अग्निशमन दलाच्या जवानांकडूनच सोशल डिस्टन्सिंग मेन्टेल केलं गेलं नसल्यानं चौफेर टीका केली जात आहे. एकीकडे राज्यातील जनतेला सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व पटवून दिलं जात असताना आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना सोशल डिस्टन्सिंग पाळावसं का वाटलं नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

राज्यात सोमवारीही दोनशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसंच राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्याही दोन हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगला फार महत्त्व प्राप्त झालं आहे. संपूर्ण देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राज्यात काय खबरदारी बाळगली जाते, यावरच या फोटोंनी सवाल उपस्थित केले आहेत.

पाहा फोटो –

१४ एप्रिलला अग्निशमन दलाची परेड होणार आहे. त्याची पूर्वतयारी करण्यासाठी सांतिनेज फायर ब्रिगेड मुख्यालयात जवान जमले होते. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!