वायरल झालेल्या बारावीच्या निकालावर मोठा खुलासा, तो निकाल खोटा!

बारावीचा निकालाबाबत पालक विद्यार्थी संभ्रमात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : बारावीच निकाल कधी लागतो, याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय. अशातच शनिवारी सोशल मीडियावर बारावीच्या निकालाबाबतची एक पोस्ट चांगलीच वायरल झाली होती. या पोस्टमुळे बारावीच्या निकालावरुन संभ्रम आणखी वाढला होता. दरम्यान, अखेर सोशल मीडियावर वायरल झालेला बारावीचा निकाल हा खोटा असल्याचं समोर आलंय.

कुणी दिलं स्पष्टीकरण?

भगिरथ शेटये यांनी दिलेल्या माहितीप्रमाणेत, गोवा बोर्डाच्या बारावीचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. येत्या एक ते दोन दिवसांत बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. गोवा बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे कुणीही अफवांना बळी पडू नये, असं आवाहन करण्यात आलंय. सोशल मीडियावरील बारावीच्या निकालाचं वृत्त पूर्णपणे खोटं असून गोवा बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार, हे लवकरच स्पष्ट केलं जाईल.

हेही वाचा : सिंधुदुर्गातील वाघिण पोचली गोव्यातील म्हादईत अभयारण्यात

दहावीचा लागला, बारावीचा कधी?

दहावीच्या निकालानंतर बारावीचा निकाल कधी लागणार, याची पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. अशातच दोन दिवसांत बारावीचा निकाल लागणार असल्याच्या शक्यतेमुळे शुक्रवारी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळाला. शनिवारी बारावीची निकाल लागणार आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (जीबीएसएचएसई) 12 वी 2021 च्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आहे. गोवा बोर्डाच्या बारावीच्या निकालाची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 12 वीचा निकाल 18 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र अजूनतरी तशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पहिला डोस घ्यावा

इथे पाहू शकता निकाल

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत बेवसाईटवर gbshse.info येथे भेट द्यावी लागेल. पुढे, होमपेजवरील गोवा बोर्ड क्लास 12 रिझल्ट 2021 लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्रे सादर करुन निकाल तपासता येईल.

गोवा बोर्डाने 12 जुलै 2021 रोजी दहावीचा निकाल जाहीर केला होता. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 23,967 विद्यार्थ्यांपैकी 23,900 विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी 99.98 आहे, तर 99.50 टक्के मुलांनी परीक्षा पास केली आहे. एकूणच 99.74 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलंय.

हेही वाचा : दिल्लीत महत्त्वाची घडामोड! पवारांनी घेतली मोदींची भेट

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!