खोर्जुवेत ग्रामस्थांनी शेडला केला कडाडून विरोध…

स्मशानभूमीजवळ कचरा शेड उभारण्यास विरोध

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : हळदोणा येथील खोर्जुवे गावातील स्मशानभूमी शेजारी उभारण्यात येणार्‍या कथित कचरा शेडवरुन सध्या गावातील वातावरण तापले आहे. ग्रामस्थांनी या शेडला कडाडून विरोध केला आहे. स्मशानभूमीच्या परिसरात आम्हाला कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प नको, असा पवित्रा सध्या या स्थानिकांनी घेतला आहे.
हेही वाचाःभाजप सोडण्याचा माझा निर्णय चुकीचा : मायकल

कचरा प्रकल्प हवा, त्याची उभारणी स्मशानभूमी शेजारी नको

खोर्जुवेतील पोडवाळ वाड्यावर रविवारी आयोजित सभेस दोनशेहून जास्त ग्रामस्थ या शेडच्या उभारणीला विरोध करण्यासाठी जमले होते. दरम्यान, गावतील ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ सोमवार २६ रोजी हळदोणा सरपंच व स्थानिक आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी याप्रश्नी चर्चा करतील. चर्चेअंती तोडगा न निघाल्यास पुढील कृती ठरविली जाईल. सदर शेड ही कचर्‍यासाठी असल्याचा दावा करीत, भविष्यात या कचर्‍यामुळे स्थानिकांवर त्याचे विपरित परिणाम होतील. तसेच स्मशानभूमीसमोर अडचणी निर्माण होतील, असा दावा ग्रामस्थांनी केला. कचरा प्रकल्प हवा, मात्र त्याची उभारणी स्मशानभूमी शेजारी नको. तसा प्रयत्न झाल्यास वेळप्रसंगी आक्रमक पवित्रा घेवू, असेही यावेळी ठरले.
हेही वाचाः१३ जणांना आमिष दाखवून ७.३२ लाख रुपयांचा गंडा…

अशाप्रकारचे प्रकल्प येण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे

पंचसदस्य यशवंत परवार म्हणाले की, मुळात अशाप्रकारचे प्रकल्प येण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. आम्हाला कचरा वर्गीकरण करणारा प्रकल्प हवा, पण या जागेत नको. तसेच आपण गावातील लोकांसमवेत आहे. पंचायत क्षेत्रातील सरकारी जागेवर शेडची उभारणी होणार, अशी माहिती मला पंचायतीकडून दिली होती. मात्र, जागेसंबंधी कल्पना दिली नसल्याचा दावा त्यांनी केला.
हेही वाचाःगोवन वार्ता लाईव्ह वेबसाईटच्या द्वितीय वर्ष पूर्तीनिमित्त…

शेड बेकायदेशीररित्या उभारली जात असल्याचा आरोप

ग्रामस्थ अमरनाथ पणजीकर म्हणाले की, कचरा वर्गीकरणासाठी स्मशानभूमी शेजारील जागा अयोग्य आहे. या प्रकल्पासाठी आम्ही इतरत्र जागा उपलब्ध करुन देवू, पण जबरदस्तीने हा प्रकल्प येथे लादल्यास आम्ही गप्प बसणार नाही. या शेडची उभारणी कशासाठी केली जाते याची माहिती स्थानिकांना पुरवली नसल्याने पंचायतीकडून यासंबंधी दिशाभूल केल्याचे तसेच शेड बेकायदेशीररित्या उभारली जात असल्याचा आरोप देविदास पणजीकर यांनी केला. माजी पंच चारुदत्त पणजीकर, माजी सरपंच दीपक नाईक, सिद्धेश नागवेकर, अमित आगरवाडेकर यांनीही विचार मांडत या शेडच्या उभारणीला विरोध केला.
हेही वाचाःInterview | भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा डेव्हलपमेंट फॉर्म्यूला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!