मोठी अटक! विलास मेथर हत्याप्रकरणी शैलेश शेट्टीला बेड्या

शैलेश शेट्टीला पकडून सात जणांना आतापर्यंत अटक

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

पणजी : पर्वरीत जिवंत जाळण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्या हत्येप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी शैलेश शेट्टी याला अटक केली आहे. ही या हत्याप्रकरणातली सातवी अटक आहे. याआधी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

शैलेश शेट्टींच्या अटकेला महत्त्व कशामुळे?

शैलेश शेट्टी यांच्या अटकेमुळे विलास मेथर प्रकरणाला आता आणखी वेगळं वळण लागलंय. कारण शैलेश शेट्टी हे आमदार रोहन खवंटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जिवंत जाळण्यात आलेल्या विलास मेथर यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांचं नाव आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. शेट्टी यांच्याविरोधात पुरावे मिळाल्यानंतर पर्वरी पोलिसांनी अटकेची कारवाई केली. ज्या हॉटेलमध्ये विलास मेथर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, तिथे शैलेशही उपस्थित होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

काय आहे विलास मेथर हत्यप्रकरण?

बुधवार 15 तारखेला सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्यावर पेट्रोल मिश्रित द्रव्य टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या इतिहासात आतापर्यंतची दिवसाढवळ्या अशाप्रकारे हल्ला करुन जिवंत माणसाला जाळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलाय.

विलास मेथर बिल्डर अल्ताफ हेरगिट्टी यांच्याविरोधात लढा देत असल्याची माहिती मिळतेय. फ्लॅटच्या कागदपत्रांवरुन त्यांचा बिल्डरशी वाद झाला होता. विलास मेथर यांची गाडी वाटेत अडवून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या धक्कादायक घटनेनंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत याप्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून पोलिस या हत्याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

हत्येवरुन राजकारणही तापलं!

विलास मेथर यांच्या हत्येवरुन आपनेही सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. गोव्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्याची टीका आपने केली आहे. काँग्रेसनेही याप्रकरणावरुन मोर्चा काढत सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला होता. दुसरीकडे राज्यसरकारवर टीका करतानाच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी आपने केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या हत्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

हेही वाचा –

बापरे! पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर त्यांचे 22 तुकडे केले

मुली असुरक्षितच! 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापानं केला बलात्कार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!