विलास मेथर हत्याप्रकरणी शेट्टीला दिलासा नाही

म्हापसा न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी, इतरांच्या कोठडीत 5 दिवस वाढ

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: पर्वरी येथील सोशल वर्कर विलास मेथर जाळून हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शैलेश शेट्टी व खय्याद शेख यांना न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

इतरांना अतिरिक्त कोठडी

याशिवय इतर 5 संशयितांना आणखी 5 दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयानं दिलेत. यात बिल्डर अल्ताफ शब्बीर यारगट्टी, पवन श्रीकांत बडिगर, प्रशांत लक्ष्मण दाभोळकर, इक्बाल नानपूरी आणि संतोष गोपालकृष्ण पिल्लाई यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण

पाटो – तोर्डा येथे विलास मेथर यांच्यावर पेट्रोल फेकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी बांबोळीतील गोमेकॉत उपचार सुरु असताना मेथर यांचा मृत्यू झाला होता. मेथर यांच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र पणजीतील हॉटेलात रचण्यात आल्याचा संशय असून, शेट्टी तिथे उपस्थित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर तपास करीत आहेत.

हेही वाचा

विलास मेथर हत्याप्रकरण – शैलेश शेट्टीला 5 दिवसांची पोलिस कोठडी

मोठी अटक! विलास मेथर हत्याप्रकरणी शैलेश शेट्टीला बेड्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!