विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन

वयाच्या ८५ व्या वर्षी विजया पणशीकरांनी घेतला अखेरचा श्वास

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः ‘नाट्यसंपदा’च्या विजया प्रभाकर पणशीकर यांचं निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. वृद्धपकाळाने त्यांचं निधन झालं असून गुरुवारी (४ फेब्रुवारी) रात्री १.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. विजया पणशीकर यांनी ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी पार पाडली होती.

१९६३ साली नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेने ‘अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर यांचे ‘मोहिनी’ अशी दोन नाटके रंगमंचावर आणली त्यानंतर ‘मला काही सांगायचंय’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशी अनेक नाटकं गाजली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!