विजया नाईक यांच्यावर १४ जानेवारीला अंत्यसंस्कार?

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरोः सोमवारी रात्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला कर्नाटकात अपघात घडला. गोकर्णच्या दिशेने जाताना त्यांच्या गाडीला हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा तसंच सचिवाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातून शोक व्यक्त केला जातोय.
१४ जानेवारीला होणार अंत्यसंस्कार
सौ.विजया उर्फ तिलोत्तमा श्रीपाद नाईक यांच्यावर गुरुवार दि. १४ जानेवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती हाती आलीये. १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ०५.०० वा आडपई (दुर्भाट) फोंडा येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यापूर्वी त्याच दिवशी दोन तास रायबंदर सांपेंद्र येथील त्यांच्या निवासस्थानी मृतदेह दोन तास ठेवण्यात येईल अशी माहिती श्रीपाद नाईक यांचे मेहुणे संतोष महानंदू नाईक यांनी आमचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांना दिली आहे. अंत्यसंस्कार कधी होणार आहेत हे अजूनपर्यंत अधिकृतपणे कुटुंबियांकडून सांगण्यात आलेलं नाही.
श्रीपाद नाईक यांच्यावर जीएमसीत उपचार सुरू
अपघातानंतर श्रीपाद नाईक यांना तातडीने जीएमसीत हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय.